क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेंच्या तब्ब्येतीसंदर्भात माहिती

एनसीबी अधिकारी समीर वानखेंडे आणि त्यांच्या टीमवर काल गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. 

Updated: Nov 24, 2020, 12:11 PM IST
क्रांती रेडकरचे पती समीर वानखेडेंच्या तब्ब्येतीसंदर्भात माहिती title=

मुंबई : मुंबईतील ड्रग्न कनेक्शनचा (Drugs Connection) मागोवा घेणाऱ्या एनसीबी अधिकारी समीर वानखेंडे (Sameer Wankhede) आणि त्यांच्या टीमवर काल गोरेगावमध्ये ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. यानंतर समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका क्रांती रेडकरने (Actress Kranti redkar) समीर ठिक असल्याचे सांगितलंय. ड्रग्ज पेडलर्सनी केलेल्या हल्ल्यात ३ एनसीबी अधिकारी जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते.  क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे यांनी २०१७ साली विवाह केला. 

सुशांत सिंग राजपूतच्या प्रकरणानंतर (Sushant singh Rajput Sucide) एनसीबीची टीम (NCB) ड्रग्ज कनेक्शनच्या (Drugs Connection) शोधात आहे. त्यामुळे ड्रग्ज पेडलर्सचे (Drugs Peddler) धाबे दणाणले आहे. ड्रग्ज पेडलर्सची चौकशी करणाऱ्या एनसीबीच्या टीमवर ड्रग्ज पेडलर्सनी हल्ला चढवला. एनसीबीच्या ५ अधिकाऱ्यांवर ड्रग्ज पेडलरकडून हा हल्ला झालाय. मुंबईतल्या गोरेगावमध्ये ही घटना घडली. ड्रग्ज पेडलर्सच्या ५० ते ६० जणांच्या घोळक्याने एनसीबीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

समीर वानखेडेंच्या (Sameer Wankhede) अंतर्गत एनसीबीती ही टीम मुंबईत काम करत आहे. काल झालेल्या हल्ल्यात समीर वानखेडे आणि त्यांचे दोन अधिकारी जखमी झाले होते. अभिनेत्री क्रांती रेडकरने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करुन समीर यांच्या तब्येतीची माहिती दिली. समीर हे ठिक आहेत. आम्ही त्यांच्यासोबत घरी आहोत. नार्कोटीक्सच्या टीमला मोठा सॅलूट जे ड्रग्ज कनेक्शनच्या विरोधात उभे ठाकलेयत. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे. अशी पोस्ट क्रांती रेडकरने लिहीली. 

 २९ मार्चला कोणताही गाजावाजा न करता साधेपणाने क्रांती आणि समीर यांचा विवाहसोहळा पार पडला. दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये जुळ्या मुलींना जन्म दिला. कोंबडी पळाली या गाण्यामुळे क्रांतीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर तिनं 'ऑन ड्यूटी २४ तास', 'माझा नवरा तुझी बायको', 'नो एन्ट्री पुढे धोका आहे', या चित्रपटांतून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली. याशिवाय क्रांतीनं 'काकण' या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.