अभिनेत्री किमचे टाईट ड्रेसमुळे झाले असे हाल, Video पाहून तुम्हीही म्हणाल, पोरी जरा हळूहळू चाल

किम कार्दशियन हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पोपट पिटेकर | Updated: Sep 28, 2022, 11:05 PM IST
अभिनेत्री किमचे टाईट ड्रेसमुळे झाले असे हाल, Video पाहून तुम्हीही म्हणाल, पोरी जरा हळूहळू चाल title=

मुंबई : हॉलीवुड अभिनेत्री किम कर्दाशियन (Kim Kardashian) तिच्या ड्रेसमुळे पुन्हा पुन्हा चर्चेत आलीये. अलीकडेच तिने मिलान फॅशन वीकमध्ये हजेरी लावली आणि रॅम्पवर न चालताही ती तिच्या उबर-टाइट स्पार्कली ड्रेसमुळे चर्चेत आली. तिने पडद्यामागील एक आनंददायक व्हिडिओ शेअर केलाय. ज्यामध्ये ती स्वत: चालण्यासाठी आणि पायऱ्या चढण्यासाठी धडपडत आहे.  

या कपड्यांमुळे तिला सरळ चालता येत नव्हते. पायऱ्या चढण्यासाठी उडी मारतानाही दिसली. वर येण्यासाठी तिने रेलिंगचाही आधार घेतला. कारमध्ये बसताना ही तिला खूपच समस्येचा सामना करावा लागला.

किमचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. काही चाहत्यांनी तिच्या फॅशनबद्दल कौतुक केले, तर काहींनी याला फक्त 'फॅशन टूर्चर' म्हटलंय.