काजोल संतापली! ''..... तरच परत या'' म्हणत कोणाला सुनावतेय खडेबोल?

'तान्हाजी' या चित्रपटासाठी नुकताच अभिनेता आणि काजोलचा पती अजय देवगण याला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. 

Updated: Aug 1, 2022, 01:45 PM IST
काजोल संतापली! ''..... तरच परत या'' म्हणत कोणाला सुनावतेय खडेबोल? title=

Kajol Instagram Story goes Viral : अभिनेत्री काजोलला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून तीस वर्षे पुर्ण झाली आहेत त्यामुळे सध्या तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. त्याचसोबत 'तान्हाजी' या चित्रपटासाठी नुकताच अभिनेता आणि काजोलचा पती अजय देवगण याला राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. तेव्हा या जोडप्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे असे असले तरी मात्र काजोलने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे ती कोणावर तरी नाराज असल्याचे समजते आहे. 

काजोलने नुकतीच इन्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. ज्यात ती म्हणते की, ''if you are not here to entertain me than go away and come back with some new material '' अशा या स्टोरीमुळे सगळे फॅन्स गोंधळात पडले आहेत तर काही फॅन्स हे काळजीतही पडले आहेत. परंतु नक्की ही पोस्ट कशासाठी आणि कोणासाठी आहे याबद्दल मात्र अद्याप काजोलने कोणताच खुलासा केला नाहीये. 

अलीकडेच काजोलने या इंडस्ट्रीत 30 वर्षे पूर्ण केली आहेत. काजोलच्या चाहत्यांनी आणि बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी तिला 30 वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभिनंदनही केले आहे. यासाठी काजोलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओही शेअर केला ज्यामध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील काही प्रसिद्ध चित्रपटांची छायाचित्रे जोडून पोस्ट आहेत. 'बेखुदी', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'गुप्त', 'प्यार किया तो डरना क्या', 'प्यार तो होना ही था', 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'फना', 'माय नेम इज खान', 'हेलिकॉप्टर ईला', 'तानाजी' आणि 'त्रिभंगा 'असे काजोलचे काही लोकप्रिय चित्रपट आहेत. 

काजोलने 31 जुलै 1992 रोजी 'बेखुदी' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. गेल्या 30 वर्षांपासून ती लोकांचे मनोरंजन करत आहे. या तीस वर्षांत तिने अनेक लोकप्रिय भूमिका साकारल्या. ज्या लोकांनाही खूप आवडल्या. काजोल लवकरच डिस्ने + हॉटस्टारच्या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. काजोल 'सलाम वेंकी' याही चित्रपटातून दिसणार असून 'रेवती' या चित्रपटाचे दिग्दर्शन ती सध्या करते आहे.