Janhavi Kapoor on Bollywood Debut: सध्या बॉलीवूडमध्ये स्टार कीड्सची हवा आहे. कायमच हिरो हिरोईनची कमेस्ट्री बॉलीवूडमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता स्टार कीड्सची (Bollywood Star Kids) कमेस्ट्रीही प्रेक्षकांना आवडते आहे. तरीही अनेकदा बॉलीवूड स्टार कीड्सना ट्रोलिंगलाही (Bollywood Star Kids Trolling) प्रचंड प्रमाणात समोरे जावे लागते. त्यातून अनन्या पांडे, जान्हवी कपूर, सुहाना खान यांना तर कायमच ट्रोल करण्यात आलं. (Actress janhvi kapoor shocking revelation about her entry bollywood news in marathi)
सध्या जान्हवी कपूर (Janhavi Kapoor In Milli) आपल्या मिली या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जान्हवी मिलीच्या निमित्ताने प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकत्याच एका मुलाखतीच्या दरम्यान जान्हवीनं आपल्या बॉलिवूड डेब्यूला घेऊन धक्कादायक खुलासा केला आहे.
हेही वाचा - तो किस्सा सांगताना अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या डोळ्यात आलं पाणी, आवंढा गिळत म्हणाला...
जान्हवी कपूरने कबूल केले की तिच्या फिल्म इंडस्ट्री कनेक्शनमुळे तिला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला. पण तिच्या पहिल्या दोन चित्रपटांनंतर तिला हाय-प्रोफाइल ऑफर येत असल्याचंही तिनं सांगितलं. एवढंच नाही तर ही ऑफर मिळाल्याने चित्रपट निर्मात्यांनी तिला तिच्या टॅलेंटवर जोरावर चित्रपटात घेत असल्याचंही सांगितलं.
नुकत्याच झालेल्या एका टॉक शोमध्ये जान्हवीनं सांगितले की, मी माझ्या फिल्म डेब्यूसाठी निर्मात्यांना चित्रपटांमध्ये कास्ट करण्यासाठी पैसे देत नाही तर मी माझ्या टेलेंटच्या जोरावर चित्रपटांमध्ये काम मिळवते आहे. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याच्या पाहिल्या दिवसानंतरच मला ट्रोलिंग आणि क्रिटिसिझमला सामोरे जावे लागले होते. परंतु मला त्याच्या फारसा काही फरक पडत नाही. (Janhavi Kapoor on Bollywood)
आपल्या बॉलिवूड एन्ट्रीबद्दल तिनं आपलं परखड मतं मांडलं आहे, "बॉलिवूडमध्ये मला कोणत्या प्रकारच्या संधी मिळत आहेत, या आधारे मी माझं विश्लेषण केलं आहे. माझा पहिला चित्रपट, होय, कदाचित मला श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी आहे म्हणून मिळाला असं लोकांना वाटत असेल, निश्चितच मलाही तेवढीच उत्सुकता होती. कदाचित ही उत्सुकता मला माझ्या पुढच्या अनेक चित्रपटांबद्दल वाटत राहिल अथवा कदाचित वाढेलही.
जान्हवी पुढे म्हणाली, "लोकांनी मला त्यांच्या चित्रपटांमध्ये घ्यावे असे मला वाटत नाही. मी इतकी श्रीमंत नाही. ना माझे वडील आहेत. परंतु त्यांना मी जे काही करतेय त्याबद्दल कौतुक आहेच. स्टार-किड लाँच करणे इतके सोप्पे नाही आणि स्टार कीड्सना लॉन्च करून शेवटी जर चित्रपट फसला तर त्यापेक्षा आर्थिक नुकसान सहन करण्याइतके मोठे काहीही नाही.", असं मतं जान्हवीनं मांडलं.
जान्हवीने 2018 मध्ये ईशान खट्टरसोबत 'धडक' (Sairat Hindi Remake Dhadak) चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने झोया अख्तरच्या नेटफ्लिक्सच्या घोस्ट स्टोरीजत मुख्य भूमिका साकारली. जान्हवीने गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल, रुही आणि गुड लक जेरी (Good Luck Jerry) यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. ती आता 'मिली'मध्ये दिसणार आहे. पुढे जान्हवीकडे मिस्टर आणि मिसेस माही (Mister and Misses Mahi) आणि बावल (Bawal) या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.