Hema Malini : अमिताभ बच्चन यांचा 'शोले' हा चित्रपट 1975 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन जवळपास अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, 5 दशकांनंतरही आजही या चित्रपटाची सोशल मीडियावर चर्चा आहे. या चित्रपटासंबंधित अनेक वेगवेगळ्या कथा सध्या समोर येत आहेत. दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटात धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, संजीव कुमार, हेमा मालिनी, अमजद खान आणि जया बच्चन या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
मात्र, तुम्हाला माहिती आहे का की अभिनेत्री हेमा मालिनी यांनी या चित्रपटासाठी निर्मात्यांसमोर एक अनोखी अट ठेवली होती. अभिनेत्रीच्या या अटीनंतर दिग्दर्शक काय म्हणाले होते. जाणून घ्या सविस्तर
हेमा मालिनीने काय ठेवली होती अट?
'शोले' चित्रपटाची कथा आणि पात्र लेखक सलीम खान आणि जावेद अख्तर या जोडीने केले आहे. त्यापैकी एक म्हणजे टांगे वाली बसंती ही व्यक्तिरेखा अभिनेत्री हेमा मालिनीने साकारली होती. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 49 वर्षे झाली आहेत. मात्र, आज देखील या चित्रपटाची आणि त्यामधील कलाकारांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
सध्या 'शोले' चित्रपटातील बसंती बनण्यासाठी हेमा मालिनीने निर्मात्यांसमोर एक अनोखी अट ठेवली होती. हे तुम्हाला माहिती नसेल. आयएमडीबीच्या अहवालावर आधारित, चित्रपटात टांगे वालीची भूमिका साकारण्यासाठी अभिनेत्रीला टांगा चालवायला हवा होता. मात्र, हेमा मालिनीला तो चालवता येत नव्हता. यासाठी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना टांगा कसा चालवायचा ते सांगण्यास सांगितले. त्यानंतर हेमा मालिनीला टांगा चालवताना दाखवले. या चित्रपटात तिने चांगली भूमिका साकारली.
'सीता और गीता'
या सिनेमासोबत अभिनेत्री हेमा मालिनीने दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'शोले' प्रदर्शित होण्याच्या तीन वर्षांपूर्वी हेमाने रमेश यांच्या 'सीता और गीता' या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात हेमा मालिनीला पंख्याला लटकावे लागले होते.