मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी

संपूर्ण जगात कमला हॅरिस यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. 

Updated: Nov 9, 2020, 05:17 PM IST
मल्लिका शेरावतने कमला हॅरिस यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी  title=

मुंबई : संपूर्ण जगात कमला हॅरिस यांच्या विजयाचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या विजयाचा सर्वाधिक आनंद भारतीयांना झाला आहे. अमेरिकेतील उपराष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी दणदणीत विजय संपादित केल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे. कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष पदी नियुक्ती झाली असून  डेमॉक्रटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्ष पदावर आपलं नाव कोरलं आहे.

दरम्यान, हॅरिस यांच्या विजयानंतर अभिनेत्री मल्लिका शेरावतने ११ वर्षांपूर्वी केलेलं एक ट्विट प्रचंड व्हायरल होत आहे. ११ वर्षांपूर्वी मल्लिकाने केलेली भविष्यवाणी काही अंशी खरी ठरली आहे.  कमला हॅरिस या एक दिवस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षा होतील, असं मल्लिकानं म्हटलेलं होतं. मल्लिका शेरावतनं २००९मध्ये हे ट्विट केलं होतं. सध्या तिचं हे ट्विट तुफान व्हायरल होत आहे. 

'एका कार्यक्रमामध्ये आनंद लुटत आहे. तिथे एक महिला बसलेली आहे, ज्यांच्याविषयी म्हटलं जात आहे की त्या अमेरिकेच्या राष्ट्रपती बनू शकतात.' असं ट्विट मल्लिकाने ११ वर्षांपूर्वी केलं होतं. सांगायचं झालं तर कमला हॅरिस अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. 

शिवाय डेमॉक्रटिक पक्षाच्या मोठ्या नेत्या म्हणून देखील त्यांची ओळख आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस विजयी झाल्यानंतर भारतातही आनंद व्यक्त होत आहे