अभिनेत्री जया प्रदा यांना तुरूंगवास; कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवल्यानं 6 महिन्यांची कोठडी

Jaya Prada Jail ESI Case: ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना 6 महिन्यांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याकडे असलेल्या सिनेमागृहातील कर्मचाऱ्यांना वेळेत ESI फंड न देऊ न केल्यानं त्यांनी ही शिक्षा झाल्याचे कळते आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 12, 2023, 10:23 AM IST
अभिनेत्री जया प्रदा यांना तुरूंगवास; कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवल्यानं 6 महिन्यांची कोठडी title=
August 12, 2023 | actress and former mp jaya prada sentenced six months jail anf 5000 rupees in an esi case

Jaya Prada Jail ESI Case: ज्येष्ठ अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना एग्मोर मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टानं सहा महिन्यांसाठी तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. त्याचसोबत 5000 रूपयांचा दंड ठोठवला आहे. त्यांचे एक सिनेमागृह आहे. या सिनेमागृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे Employees State Insurance (ESI) फंड त्यांना वेळेवर देण्यात त्या आणि त्यांचे सहकारी अयशस्वी ठरल्यानं त्यांना या कारवाईअंतर्गत ही शिक्षा झाल्याचे समोर आले आहे. या सिनेमागृहाच्या एका कर्मचाऱ्यानं जया प्रदा यांच्याविरूद्ध कर्मचाऱ्यांना वेळेवर ESI न दिल्याकारणाप्रकरणी आरोप केले होते. 

यावेळी येथील कर्मचाऱ्यांनी आरोपात धक्कादायक खुलासे केले आहेत. झी न्यूजच्या रिपोर्टनुसार, हे सिनेमागृह बंद होते. त्यातून गेली दहावर्षे त्यांना आपला फंड मिळत नव्हता. गेल्या दशकभरात येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या पगारातून जरी ESI फंड कापला जात असला तरीसुद्धा तो राज्य विमा महामंडळाकडे पाठवला जात नव्हता. ही रक्कम त्यांना परत मिळत नसल्यानं त्यांनी न्यायलयाच्या मार्गानं जाण्याचे ठरविले. 

का केली शिक्षा? 

याप्रकरणी जया प्रदा आणि सिनेमागृहाचे व्यवस्थापन करणारे तिघे जणं यांनी मद्रास उच्च न्यायलयात याचिकाही सादर केली होती. एग्मोर कोर्टाची कारवाई थांबवण्याची त्यांनी या याचिकेतून विनंती केली होती. परंतु उच्च न्यायलयानं त्यांची ही याचिका फेटाळून लावली होती. त्यानंतर कोर्टाच्या तारखेला जया प्रदा यांनी कर्मचाऱ्यांना देऊ असलेली रक्कम निकाली काढण्याची ऑफर दिली होती. त्यावर ESI च्या प्रतिनिधीनं आक्षेप घेतला आणि न्यायधीशांनी त्यांना सहा महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. हे सिनेमागृह चेन्नई येथे आहे. येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे या सिनेमागृहाचे काम बंद होते. 

हेही वाचा - '...नाहीतर सगळं गोदामात जाईल'; घराणेशाहीवर ए.आर.रेहमान यांची तिखट प्रतिक्रिया

कोण आहेत जया प्रदा? 

जया प्रदा या लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांतून बॉलिवूडच्या दिग्गजांसोबत अभिनय केला आहे. त्यानंतर त्या राजकारणात आल्या होत्या. 1986 साली त्यांनी निर्माते श्रीकांत नहाता यांच्याशी लग्न केले. श्रीकांत हे आधीच विवाहित होते व त्यांना 3 मुलं देखील होती. जया प्रदा यांनी कमल हसन, मोहन लाल, रजनीकांत, अमिताभ बच्चन यांच्यासह अभिनय केला आहे.  त्यांनी हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्ल्याळम चित्रपटांतूनही कामं केली आहेत. त्यांनी 1994 नंतर राजकारणातही प्रवेश केला होता. त्यामुळे त्यानंतर त्यांची चांगलीच चर्चाही रंगली होती. मध्यंतरी त्या एका डान्स रिएलिटी शोमधून समोर आल्या होत्या.