VIDEO : अदा शर्माचे मजेदार रिटर्न गिफ्ट, पाहा व्हिडिओ

हा व्हिडिओ होतोय व्हायरल 

Updated: May 11, 2018, 06:14 PM IST
VIDEO : अदा शर्माचे मजेदार रिटर्न गिफ्ट, पाहा व्हिडिओ  title=

मुंबई : सोशल मीडिया हे एक अस माध्यम आहे ज्याचा वापर सिने कलाकार खूप चांगल्या पद्धतीने करतो. असाच वापर कमांडो 2, 1920 सारख्या सिनेमांमध्ये काम केलेली अभिनेत्री अदा शर्मा देखील करत आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अदा शर्मा कायम अॅक्टिव असते. आजीसोबत डान्स करणारी अभिनेत्री अदा शर्मा काही दिवसांपासून चर्चेत होते. आता तिने आपल्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट चाहत्यांना दिलं आहे. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अदाने हा व्हिडिओ शेअर करताना सांगितलं आहे की, माझ्या वाढदिवसानिमित्त खूप जणांनी शुभेच्छा दिल्या आणि अनेक गिफ्ट दिले आहेत त्यांचे मी आभार मानत आहे. 
गेल्या आठवड्यापासून मला वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा येत आहे. तुमच्या सगळ्यांमुळे मी खूप खूष आहे. मला माझा डान्स व्हिडिओ अपलोड करण्यासाठी अनेक रिक्वेस्ट आल्या आहेत. याकरता मी हा व्हिडिओ इथे अपलोड करत आहे.  

फॅन्सना दाखवला जबरदस्त Dance अदा शर्मा ही साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील लोकप्रिय आहे. अदाने साऊथ रॉक स्टार अभिनेता अल्लू अर्जूनसोबत सन ऑफ सत्यमूर्त देखील शेअर केली आङे. अदा आता लवकरच तमिळ अभिनेता आणि कोरियोग्राफर प्रभूदेवा सोबत चार्ली चॅप्लिन 2 मध्ये देखील दिसली होती. अदा शर्माने 2008 मध्ये 1920 या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे.