सेटवर असलेल्या बॉय आणि मराठी कलाकारांचे मानधान एकसारखेच! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

 निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे जेवढी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. श्वेता शिंदेने २००१ मध्ये झोका मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. झोका या मालिकेला यंदा २२ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व कलाकार एकत्र आले होते. नुकतीच श्वेताने के क्राफ्ट या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने मराठी व हिंदी मधील मानधनावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Updated: Dec 18, 2023, 04:12 PM IST
सेटवर असलेल्या बॉय आणि मराठी कलाकारांचे मानधान एकसारखेच! अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा title=

मुंबई : निर्माती आणि अभिनेत्री श्वेता शिंदे जेवढी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे जितकी चर्चेत असते तितकी ती पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत असते. श्वेता शिंदेने २००१ मध्ये झोका मालिकेत महत्वाची भूमिका साकारली होती. झोका या मालिकेला यंदा २२ वर्ष पूर्ण झाल्यामुळे सर्व कलाकार एकत्र आले होते. नुकतीच श्वेताने के क्राफ्ट या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी तिने मराठी व हिंदी मधील मानधनावर मोठं वक्तव्य केलं आहे.

श्वेताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, ''त्यावेळी मी हिंदी शोमध्ये काम करायचे पण, प्रतिमा ताईंची 'प्रपंच' ही मालिका मला खूप आवडायची. 'प्रपंच' या मालिकेचा मी एकही एपिसोड चुकवला नव्हता. त्यावेळी सोनाली पंडित यांच्या ओळखीने मी 'प्रपंच'च्या सेटवर ताईंची भेट घेतली होती. पुढे, जेव्हा प्रतिमा ताईंचा 'झोका'साठी फोन आला तेव्हा मी आनंदाने उड्या मारल्या होत्या... अरे बापरे! त्यांना मला कास्ट करायचंय यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असू शकते अशी भावना माझ्या मनात त्यावेळी निर्माण झाली होती. प्रतिमा ताई, सुनिल बर्वे यांच्याशी बोलणं झाल्यावर मी निर्माते विद्याधर पाठारेंना भेटले. त्यांनी दैनंदिन मानधनाची एक विशिष्ट रक्कम मला सांगितली. 

मानधनाचा तो आकडा ऐकून माझ्या मनात असा विचार आला की, अरे एवढी रक्कम तर मी माझ्या बॉयला देते. ही रक्कम आपल्यासाठी कशी काय असू शकते? मला एका सेकंदासाठी ते माझ्या बॉयला मिळणारे पैसे सांगत असतील असंच वाटलं. कारण, तेव्हा मी फार लहान होते. पण, थोड्यावेळात निर्मात्यांनी मला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या आणि म्हणाले, नाही नाही हे तुला मिळणारे पैसे आहेत बॉयला नाही. 

त्यांचं म्हणणं ऐकल्यावर मी असा विचार केला की, आपल्याला काहीच मिळत नाही असं समजायचं आणि सेटवर फक्त आनंदासाठी यायचं. इथे जो काही मोबदला मिळेल तो आपल्या बॉयला द्यायचा. पुढे सुवर्णा ताईंचा फोन आल्यावर मी हिंदी मालिकेच्या शूटिंगच्या तारखा जुळवून 'झोका' मालिकेसाठी वेळ काढला. या निमित्ताने माझं मराठीत ओपनिंग झालं आणि खूप चांगली संधी मिळाली.'' असं श्वेता शिंदेंनी सांगितलं.