coronavirus : वरुण धवनची मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सहायता निधीला मदत

चीनमध्ये उदयास आलेला हा विषाणू दिवसागणिक संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. 

Updated: Mar 28, 2020, 09:23 PM IST
coronavirus : वरुण धवनची मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री सहायता निधीला मदत title=

मुंबई  :  जगभरामध्ये थैमान घातल्यानंतर कोरोना व्हायरस भारतातही पोहोचला आहे. भारतामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ९०० च्या जवळ जाऊन पोहोचली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या लढाईचा सामना करण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली होती. त्यानंतर अनेक कलाकार कोरोनावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अभिनेता वरूण धवनने देखील मुख्यमंत्री सहायता निधी आणि  प्रधानमंत्री सहायता निधीला मदत केली आहे. 

वरूणने  मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रूपयांची मदत केली आहे, तर प्रधानमंत्री सहायता निधीला ३० लाख रूपयांची मदत केली आहे. याबाबतचं ट्विट अभिनेता  वरूण धवनने केले आहे. याआधी अभिनेता अक्षय कुमार प्रधानमंत्री सहायता निधीला २५ कोटी रुपयांची मदत केली आहे. 

अक्षय कुमारसोबतच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही मदत केली आहे. सचिनने मुख्यमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये आणि प्रधानमंत्री सहायता निधीला २५ लाख रुपये दिले आहेत. 

चीनमध्ये उदयास आलेला हा विषाणू दिवसागणिक संपूर्ण जगासाठी अत्यंत धोकादायक ठरत आहेत. आजच्या आकड्यानुसार संपूर्ण जगात ६ लाख १७ हजार ७०० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २८ हजार ३८१ रुग्णांचा या धोकादायक विषाणूमुळे बळी गेला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे १ लाख ३७ हजार ३३६ रुग्णांनी या आजारावर मात केली आहे.