'संध्याकाळी तरी दारूची दुकानं उघडा', ऋषी कपूर यांची मागणी

 देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.

Updated: Mar 28, 2020, 08:18 PM IST
'संध्याकाळी तरी दारूची दुकानं उघडा', ऋषी कपूर यांची मागणी title=

मुंबई : देशभरामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच उघडी ठेवण्यात येणार आहेत. बॉलीवूड अभिनेते ऋषी कपूर यांनी मात्र दारूची दुकानं उघडी ठेवण्यात यावीत, अशी अजब मागणी केली आहे. यासाठी ऋषी कपूर यांनी कारणही दिलं आहे.

'विचार करा. सरकारने संध्याकाळी तरी दारुची दुकानं उघडी ठेवण्याला परवानगी द्यावी. चुकीचा अर्थ काढू नका. उदासवाण्या आणि अनिश्चिततेच्या या काळात लोकं घरी आहेत, त्यांना दिलासा मिळेल. काळ्या बाजारात तर दारूची विक्री होत आहे,' असं ऋषी कपूर म्हणाले.

'राज्य सरकारला एक्साईजमधून पैशांची खूप गरज आहे. मंदीमध्ये निराशेची भर पडू नये. लोकं दारू तर पित आहेत, मग कायदेशीर करा. ढोंगीपणा नको, हे माझे विचार आहेत,' असं दुसरं ट्विट ऋषी कपूर यांनी केलं आहे.