सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नीला अश्रू अनावर

लवकरच श्रेयस तळपदेचा 'ही अनोखी गाठ'  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. या सिनेमातून तो पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. 

Updated: Feb 13, 2024, 07:47 PM IST
सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नीला अश्रू अनावर title=

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला १५ डिसेंबर २०२३ रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्याची ही बातमी समजताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला होता. हृद्यविकाराच्या झटक्यानंतर  श्रेयसवर वेलव्हू रुग्णालयात  अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र आता श्रेयसची ठिक असून तो कमबॅकसाठी सज्ज झाला आहे. ही अनोळखी गाठ या सिनेमाच्या माध्यमातून श्रेयस लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या कार्यक्रमात चाहत्यांनी लिहिलेलं पत्र ऐकून श्रेयस व त्याची पत्नी दीप्ती तळपदे हे दोघेही काहीसे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

नुकताच श्रेयसने त्यात्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या शेवटी दिप्ती आणि श्रेयस दोघंही भावूक होत रडताना दिसतात.  यावेळी श्रेयस म्हणाला, ''माझ्यासाठी हा क्षण खूप खास आहे. मी खरंच आता रडतोय. माझ्याकडे शब्द नाहीत. माझ्याबरोबर जे झालं त्याची उजळणी खरंच नको पण, असं कोणत्या वैऱ्याबरोबरही होऊ नये. खूप लोकांचं प्रेम, आशीर्वाद, जप, प्रार्थना या काळात मला लाभलं. लोकांनी माझ्यासाठी मोठ्या प्रेमाने सर्वकाही केलं. या जन्मात मी हे ऋण फेडू शकणार नाही. खरंतर माझा हा नवीन जन्म आहे. मी प्रत्येकाचे आभार मानतो.''

''कोणत्याही कलाकारासाठी आपला चित्रपट प्रदर्शित होतोय ही भावना खूप खास असते. या सगळ्या काळात जेव्हा मला आपण चित्रपट प्रदर्शित करूया असं सांगण्यात आलं तेव्हा मी खरंच आनंदी झालो. महेश दादा, झी स्टुडिओज, मंगेश कुलकर्णी, अश्विन कुलकर्णी व त्यांची संपूर्ण टीम यांचे मी मनापासून आभार मानतो. . या सगळ्या काळात पत्नीने प्रसंगावधान दाखवत मला मृत्यूच्या दारातून परत आणलं. त्यामुळे माझी पत्नी माझ्यासाठी सावित्री ठरली” असं अभिनेत्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.  ‘ही अनोखी गाठ’ हा चित्रपट येत्या १ मार्चपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हॅलेंटाईन वीक'मध्ये या चित्रपटाचे जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांचे असून यात श्रेयश तळपदे, गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काकस्पर्श', 'नटसम्राट', 'पांघरूण' या विलक्षण प्रेमकहाणीनंतर झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर मुव्हीज पुन्हा एकदा एक अनोखी प्रेमकहाणी घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाले आहेत. 'ही अनोखी गाठ' असे या चित्रपटाचे नाव असून काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती.