PHOTO : 'डोंबिवली रिटर्न' जे जातं...तेच परत येतं?

डोंबिवली ट्रेन 

PHOTO :  'डोंबिवली रिटर्न' जे जातं...तेच परत येतं? title=

मुंबई : डोंबिवली म्हटलं की, डोळ्यासमोर येतो तो रेल्वेचा खडतर प्रवास... डोंबिवलीकरांच्या या सर्व व्यथा मांडणारा सिनेमा 'डोंबिवली रिटर्न' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'डोंबिवली रिटर्न' जे जातं...तेच परत येतं?  या सिनेमाचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. या सिनेमात संदीप कुलकर्णी आणि राजेश्वरी सचदेव पहिल्यांदाच एकत्र आले असून, या चित्रपटातून प्रेक्षकांना सकस कथानकासह अभिनयाची जुगलबंदी अनुभवायला मिळेल. २२ फेब्रुवारीला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 

' Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मुळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे ह्याचं चित्रं उभं करणारी हा चित्रपट आहे. ही कथा मला  सुचली मुलुंड - सीएसटीच्या एका प्रवासात... संदीप कुलकर्णीला ती आवडली. आपला पहिला सिनेमा कसा असावा ह्या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला. 

तो नट म्हणून जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरंतर तो माझा कॉलेजपासूनचा दोस्त. आम्ही एकत्र नाटकातून कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिल्या चित्रपटाचे (प्रेमसूत्र) मी संवादही लिहिले होते. सुरुवातीला हा चित्रपट करताना मला जराही ताण नव्हता. पण जेव्हा तो बाय-लिंग्वल (हिंदी आणि मराठी दोन्ही भाषांत) करायचा ठरला तेव्हा थोडं दडपण आलं. 

कारण ह्या सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा 'डोंबिवली फास्ट'चा सिक्वेल आहे असं वाटेलही... पण ह्या पेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या चित्रपटाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच,' असं लेखक दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी सांगितलं. 

कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. महेंद्र तेरेदेसाई यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटाचं पोस्टर अत्यंत लक्षवेधी आहे. कारण, कथानकाचा नायक त्याची पत्नी आणि मुलीसह उभा आहे. त्या तिघांच्याही चेहऱ्यावरचे भाव अस्वस्थतेचे आहेत. स्वाभाविकच त्यांच्या बाबतीत काय घडलं असेल याचं कुतूहल या पोस्टरमधून निर्माण होतं.

पोस्टरमधून दिसणाऱ्या अस्वस्थतेमुळे निर्माण झालेलं "डोंबिवली रिटर्न"जे जातं...तेच परत येतं?विषयीची उत्सुकता आता २२ फेब्रुवारीला मोठ्या पडद्यावरच पूर्ण होईल.