VIDEO : रविनाच्या मुलीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

या व्हिडिओत राशा बॉक्सिंगची प्रॅक्टीस करताना दिसत आहे...

Updated: Jan 7, 2019, 02:01 PM IST
VIDEO : रविनाच्या मुलीचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनची मुलगी राशा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर राशा हिला 'छोटी मेरी कॉम' असं संबोधलं जातंय... कारण, या व्हिडिओत राशा बॉक्सिंगची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. रवीनाने आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर करत तिची तुलना मेरी कोम हिच्याशी केलीय. या व्हिडिओत राशा एकदम आक्रमक दिसून येतेय. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

No One just No One messes with Mah Baybee . My lil #marykom ️

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

वर्षाच्या सुरुवातीलाच रवीनानं वर्कआऊट आणि हेल्दी लाईफस्टाईलचं महत्त्व सांगताना आपले काही जिममध्ये घाम गाळतानाचे फोटो शेअर केलेत... आणि राशाही काही रवीनापेक्षा कमी नाही, असं तुम्हीही हा व्हिडिओ पाहून म्हणाल... 

राशाचा हा व्हिडिओ शेअर करताना 'कुणीही माझ्या मुलीशी पंगा घेणार नाही... माझी छोटी मेरी कोम' असं रवीनानं म्हटलंय.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#newyeargoals! Gotta work it out! #fitnessgoals #happynewyear

A post shared by Raveena Tandon (@officialraveenatandon) on

आपलाही एक फोटो शेअर करताना रवीनानं त्याला नवीन वर्षाचा संकल्प म्हटलंय... 
"#newyeargoals! Gotta work it out! #fitnessgoals #happynewyear." असं कॅप्शन तिनं या फोटोसोबत जोडलंय.