Riteish Deshmukh कडून 'एक्स'बद्दल वक्तव्य, लोकांना सांगितली याबद्दलची मोठी गोष्ट

रितेशच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. 

Updated: Jan 21, 2022, 04:33 PM IST
Riteish Deshmukh कडून 'एक्स'बद्दल वक्तव्य, लोकांना सांगितली याबद्दलची मोठी गोष्ट title=

मुंबई : अभिनेता रितेश देशमुखने मराठी सिनेमांसोबतच बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्याने आपली एक वेगळीच ओळख निर्माण केला आहे. अभिनेता रितेशने अभिनेत्री जेनिलिासोबत काही वर्षांपूर्वी लग्न केलं आहे आणि या दोघांना दोन गोंडस मुलं देखील आहेत. रितेश सोशल मीडियावरही खूप सक्रिय असतो. रितेश हा त्याच्या बायकोसोबत तर कधी एकटा अनेक व्हिडीओ बनवत असतो आणि सोशल मीडियावरती शेअर करत असतो. त्याचे हे व्हिडीओ चाहत्यांना देखील फार आवडतात.

रितेशचे व्हिडीओ सगळ्यांचे मनोरंजन करताता आणि लोकांना हसवतात. मुळातच रितेश कॉमेडी चांगली करत असल्यामुळे त्याला लोकांचं मनोरंजन करणं चांगलचं जमतं.

नुकतंच रितेश देशमुखने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो एक्सबद्दल वक्तव्य करत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहतेही देखील स्वत:ला त्यावर कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत.

या व्हिडीओमध्ये रितेश देशमुख एक्ससाठी नाराज आणि दु:खी असलेल्या लोकांबद्दल वक्तव्य करत आहे.

या व्हिडीओमध्ये रितेश दुखी होऊन म्हणतो की, 'मला माहित नाही की लोक एक्स बद्दल इतके दुःखी का आहेत, जर या जगात आणखी 25 अक्षरे आहेत.' रितेश जेव्हा एक्सबद्दल बोलतो, तेव्हा लोकांना वाटतं की, खरोखर नाराज होऊन रितेश आपल्या एक्सबद्दल काहीतरी सांगतोय का? परंतु त्याचा बोलण्याचा उद्देश इंग्लिश अल्फाबेटमधील 'X' या अक्षराबद्द आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रितेशच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. हा व्हिडीओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

अभिनेत्याच्या या व्हिडीओवर कमेंट करताना, एका चाहत्याने म्हटले – 'आपकी बात में दम है सर'. तर दुसऱ्या युजरने म्हटले - 'सर, मलाही X बद्दल दु:ख झाले होते पण तुमचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आता मी दुखी नाही'. रितेशने येत्या काही दिवसांत असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहे. रितेशच काय तर त्याची बायको जेनेलिया सुद्धा असे व्हिडीओ सोशल मीडियावरती शेअर करुन चाहत्यांचे मनोरंजन करत असते.