''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Swatantra Veer Savarkar Movie Teaser: आज स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 140 वी जयंती आहे. त्यानिमित्तानं आज  'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता रणदीप हुडा यावेळी या चित्रपटाच्या मुख्य भुमिकेत आहे. त्यानं या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. 

''गांधीजी वाईट नव्हते पण...'' रणदीप हुडाच्या स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित title=
May 28, 2023 | Mumbai, Swatantrya Veer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज 140 वी जयंती आहे. त्यानिमित्तानं 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा टीझरही नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Photo :Randeep Hooda | Instagram)

Swatantra Veer Savarkar Movie Teaser: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जीवनावर आधारित 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. आज त्यांची 140 सावी जयंती आहे. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या चित्रपटाचा आज टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता रणदीप हुडा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भुमिकातून दिसणार आहे. या टीझरमध्ये रणदीप हुडाच्या लुकवरही अनेकांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावेळी या चित्रपटात प्रमुख भुमिका करणारा अभिनेता रणदीप हुडा या टीझर लॉन्चला उपस्थित होता.

यावेळी तो म्हणाला की, ''सावरकरांचे आयुष्य हे अतुलनीय होते आणि या चित्रपटाच्या निमित्तानं मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेता आले आणि त्यांच्याबद्दल मला अधिकच कौतुक वाटले. तेव्हा आज त्यांची 140 वी जयंती आहे. यानिमित्तानं आम्हाला आमच्या या चित्रपटाची खास झलक तुमच्यासोबत शेअर करताना खूप आनंद होतो आहे.'' या टीझरची सुरूवात रणदीप हुडाच्या संवादानं होते. यामध्ये तो म्हणतो, ''गांधीजी हे वाईट नव्हते परंतु ते त्यांच्या अहिंसेच्या धोरणावर अडून राहिले नसते तर भारताला 35 वर्षांपुर्वीच स्वातंत्र्य मिळाले असते.''

या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मितीही रणदीप हुडानं केली आहे. सोबतच आनंद पंडित, संदीप सिंग, सॅम खान आणि योगेश रहार यांनीही या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यावेळी या चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित म्हणाले की, ''हा चित्रपट आमच्यासाठी अत्यंत अभिमानास्पद असा प्रोजेक्ट आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आपल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य असा वाटा आहे.'' यावेळी रणदीप हुडानं आपल्या सोशल मीडिया अकांऊटवरूनही या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. त्यानंतर कॅप्शनमध्ये लिहिलंय की, ''मोस्ट वॉन्डेट इंडियन बाय ब्रिटिश. स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाष चंद्र बोस, भगत सिंग आणि खुंदीराम बोस यांच्यामागील प्रेरणा. कोण होते वीर सावरकर? त्यांची संपुर्ण सत्यकथा पाहायला विसरू नका.''

हेही वाचा - करिअरच्या सुरुवातीलाच 'या' 21 वर्षीय अभिनेत्रीचा किसिंग सीनला नकार! म्हणाली, ''मलाही आजच पश्चात्ताप...''

रणदीप हुडा हा लोकप्रिय हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे, त्यानं यापुर्वी अनेक चित्रपटांतून कामं केली आहेत. 'हायवे', 'मर्डर 3', 'सर्बजित', 'जीस्म 3' अशा काही चित्रपटांतून त्यानं भुमिका केल्या आहेत. त्यानं हॉलिवूडच्याही चित्रपटांमधून कामं केली आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सलमानच्याही अनेक चित्रपटांमधून त्यानं भुमिका केल्या आहेत. त्याचे सोशल मीडियावरही अनेक चाहते आहेत. इन्टाग्रामवरही तो चांगलाच सक्रिय असतो. गेली वीस वर्ष तो या मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहे.