VIDEO : साराचं प्रपोजल कार्तिकने स्वीकारलं?

साराविषयी कार्तिक म्हणाला.... 

Updated: Nov 20, 2018, 01:41 PM IST
VIDEO : साराचं प्रपोजल कार्तिकने स्वीकारलं? title=

मुंबई : हिंदी कलाविश्वात सध्याचा काळ हा अनेक नवख्या कलाकारांना प्रकाशझोतात आणत आहे. अशाच नवख्या कलाकारांमधील काही नावं म्हणजे सारा अली खान आणि कार्तिक आर्यन. इथे कार्तिक आणि साराचच नाव घेण्याचं कारण म्हणजे सारानेच केलेलं एक वक्तव्य. 

'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये आपल्या वडिलांच्या म्हणजेच अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत आली होती. त्याचवेळी सारा आणि सैफने या कार्यक्रमात अगदी दिलखुलास गप्पा मारत करणच्या प्रश्नांना उत्तरं दिली. 

गप्पांच्याच ओघात आपण अभिनेता कार्तिक आर्यन याला डेट करु इच्छितो असं सारा म्हणाली होती. इतकच नव्हे तर एका रेडिओ शोमध्येही कार्तिकला आपण आपला पत्ता पाठवू इच्छितो, असं ती म्हणाली. 

कार्तिक एक अभिनेता म्हणून आपल्याला फार आवडत असल्याचं सारा बऱ्याच कार्यक्रमांमध्ये म्हणाली आहे. तिच्या याच वक्तव्यांविषयी थेट कार्तिक आर्यनलाच जेव्हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्याचं उत्तर ऐकून अनेकांच्याच भुवया उंचावल्या. 

'सारा तुला डेट करु इच्छिते यावर तुझी काय प्रतिक्रिया आहे?', असं जेव्हा त्याला विचारण्यात आलं तेव्हा या प्रश्नाचं उत्तर देत कार्तिकच्या चेहऱ्याव स्मितहास्य खुललं. या प्रश्नाचं उत्तर नेमकं कोणत्या शब्दांत द्यावं हेच त्याला कळेनासं झालं. 

अखेर, 'सारा ही खुप सुरेख अभिनेत्री असून, डेट वगैरेविषयी म्हणाल तर, हो तिच्यासोबत कॉफी प्यायला मला नक्कीच आवडेल', असं तो म्हणाला. आता त्याने दिलेलं हे उत्तर पाहून साराच्या आनंदाला उधाण आलेलं असणार ही बाब नाकारता येणार नाही. एका अर्थी अप्रत्यक्षरित्या कार्तिकने तिचं प्रपोजल स्वीकारलं असं म्हणायला हरकत नाही. 

येत्या काळात आता ही जोडी नेमकी कोणत्या निमित्ताने प्रेक्षकांना एकत्र पाहायला मिळते हे पाहणंही औत्सुक्याचं ठरणार आहे.