5 वेळा मलायका अरोराच्या खूप जवळ आला अर्जुन कपूर

काय आहे हे प्रकरण 

5 वेळा मलायका अरोराच्या खूप जवळ आला अर्जुन कपूर title=

मुंबई : पद्मावत स्टार रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण लग्नबंधनात अडकले आहेत. आता चाहत्यांच लक्ष अनेक जोड्यांवर आहे जे लवकरच लग्न बंधनात अडकतील. यातीलच एक जोडी म्हणजे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. मलायका अरबाज खानची घटस्फोटीत पत्नी असून आता ती 12 वर्षे लहान असलेल्या अभिनेता अर्जुन कपूरसोबत जवळीक वाढवताना दिसत आहे. 

दोघांची जवळीक असल्याचं आम्ही नाही पण त्यांचे फोटोच सांगत असतात. अर्जुन आणि मलायका आता एकमेकांच्या खूप जवळ आल्याचं स्पष्ट झालं आहे. हे कलाकार अनेकदा पार्टीत दिसतात तर कधी एअरपोर्टवर. 

15 नोव्हेंबर रोजी मलायकाच्या घरी पार्टी होती. या पार्टीत मलायकाच्या मैत्रिणी करीना कपूर खान, अमृता सिंह, सीमा खान, सोफी चौधरी देखील होत्या. या पार्टीतील अर्जुन आणि मलायकाचा एक फोटो अतिशय व्हायरल झाला. 

एका वाहिनीवर देखील हे दोघं एकत्र दिसले. या शोचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. ज्यामध्ये अर्जुन कपूर मलायकाचा हात पकडून जाताना दिसतो. यावरून हे स्पष्ट झालं आहे की, हे दोघं आता आपलं नातं जगासमोर घेऊन येऊ इच्छितात. 

अनेकदा परदेशात एकत्र सुट्या घालवताना दिसले दोघे. तर मुंबई आणि बाहेरही रेस्टॉरंटमध्ये वेळ घालवताना दिसले दोघे