Jayant Sawarkar Death : लोकप्रिय मराठमोळे अभिनेते जयंत सावरकर यांचे आज 24 जुलै रोजी वृद्धापकाळाने ठाण्यात निधन झाले होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र, आज सकाळी 11.30 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली होती. वयाच्या 87 व्या वर्षी जयंत सावरकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेते जयंत सावकरकर यांच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी आणि मालिका विश्वात न भरुन खूप मोठी पोकळी निर्माण झाली असं म्हटलं जात आहे. जयंत सावरकर यांनी 100 हून अधिक मराठी चित्रपट, नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. मराठीसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं होते. सध्या तरी त्यांचे पार्थिव ठाणे येथील रुग्णालयात असून त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार बाबत माहिती नंतर देण्यात येईल अशी माहिती त्यांचे पुत्र कौस्तुभ सावरकर यांनी दिली आहे.
जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी झाला होता. जयंत सावरकर हे मुळचे गुहागरचे होते. त्यांच्या वडिलांचा लहानमोठा व्यवसाय होता. त्यासाठी त्यांचे वडील रोज सकाळी उठून चरकातून उसाचा हंडाभर रस काढायचे आणि त्यानंतर चालत जाऊन आरे गावापर्यंत हा रस विकायचे. जयंत सावरकर हे 21 भावंडांमध्ये सगळ्यात धाकटे होते. जयंत सावरकर यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करायचे त्यामुळे त्यांच्या वडिलांना जयंत यांना मुंबईत पाठवले. त्यानंतर जयंत सावरकर हे त्यांच्या भावासोबत गिरगावात राहु लागले. त्यासोबतच जयंत सावरकर हे नोकरी करू लागले. जयंत सावरकरांनी त्यानंतर नोकरी सोडून जयंत सावरकर यांनी पूर्णपणे नाटकात काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाला त्यांचे सासरे नटवर्य मामा पेंडसे यांचा विरोध होता. त्यांची इच्छा होती की जयंत सावरकर यांनी नोकरी करायला हवी. पण तरीदेखील त्यांनी जयंत यांच्या कामाला पूर्ण पाठिंबा दिला होता. सावरकरांनी सासरेबुवांचा सल्ला मानला आणि श्रद्धा व निष्ठेने रंगभूमीची सेवा सुरू केली.
त्यांनी आजवर अनेक मराठी नाटकं आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर 20 वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली हती. त्यानंतर ते नेहमीच कोणत्या ना कोणत्या नाटकाच्या निमित्तानं रंगभूमीवर दिसायचे. जयंत सावरकर यांना 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. 30 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. वयाच्या पंचाहत्तरीनंतर त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये कामे करायला सुरुवात केली. अजय देवगण, इरफान खान, जॉन अब्राहम यांसारख्या कलाकारांबरोबर त्यांनी काम केले.