चिमुरडीचा 'संभाजींना' घरी येण्याचा आग्रह, कारण ऐकून डॉ. कोल्हे भावूक

स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेला प्रेक्षकांची पसंती 

Updated: Feb 14, 2020, 12:04 PM IST
 चिमुरडीचा 'संभाजींना' घरी येण्याचा आग्रह, कारण ऐकून डॉ. कोल्हे भावूक  title=

मुंबई : झी मराठीवरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेने आता महत्वाचं वळण घेतलं आहे. मालिकेने अगदी सुरूवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. छत्रपती शिवाजी महाराजांनी 'स्वराज्य' संभाजी राजेंनी अतिशय खंबीरपणे सांभाळालं. संभाजीराज्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता डॉ अमोल कोल्हेंवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. या प्रेमाचाच अनुभव कोल्हेंनी शेअर केला आहे. 

डॉ अमोल कोल्हेंनी आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आपल्या मतदार संघातील एका चिमुरडीची गोष्ट शेअर केली आहे. 'आज मतदारसंघात एक चिमुरडी भेटली. रस्ता अडवून डोळ्यांत पाणी आणून सांगत होती आज बाहेर जाऊ नका माझ्या घरी चला.... नाहीतर ते तुम्हाला पकडतील... मी निशःब्द कृतकृत्य!' (महाराज.... घात झाला! 'स्वराज्यरक्षक संभाजीं'ची गनिमांशी झुंज) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Dr. Amol Kolhe (@amolrkolhe) on

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं रक्षण करणाऱ्या संभाजी राजेंवर शत्रू चालून येतात हा अखेरचा टप्पा दाखवण्यात येत आहे. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यापर्यंत साऱ्यांवरच या क्षणाचा ताण आहे. याचं उत्तम उदाहरण संभाजी राजेंची भूमिका साकारणाऱ्या डॉ अमोल कोल्हेंनी शेअर केला आहे.

काही दिवसांतच मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता काळीज फाटेल, काळजात धस्स होईल, काळजाला घरे पडतील असा दुर्दैवी क्षण.... अशा पद्धतीचे क्षण मालिकेत पाहायला मिळत आहेत.