अभिनेते Dilip Kumar रूग्णालयात दाखल

जाणून घ्या दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबद्दल 

Updated: Jun 30, 2021, 06:51 AM IST
अभिनेते  Dilip Kumar रूग्णालयात दाखल title=

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना हिंदुजा रूग्णालयात  दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितले जात आहे. दिलीप कुमार रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी देखील त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा त्यांना श्वास घेण्यास अडथळे येत होते. तेव्हा देखील त्यांना हिंदुजा रूग्णालयात दाखल केलं होतं. 

तपासणीत दिसून आलं की त्यांच्या फुफ्फुसांच्या बाहेर लिक्विड जमा झाला होतं. उपचारानंतर लिक्विड बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना डिसचार्ज मिळाला. तेव्हा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असं दिलीप कुमार यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आलं होतं. खुद्द दिलीप कुमार यांच्या कुटुंबाने सोशल मीडियाच्या मध्यमातून प्रकृती बद्दल माहिती दिली होती. 

सायरा बानो म्हणाल्या, 'दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल केलं आहे. ज्या रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे, ते कोरोना रूग्णालय नाही. डॉ नितिन गोखले यांच्या देखरेखीखाली दिलीप कुमार यांच्यावर उपचार सुरू आहेत. तुम्ही त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करा.' असं देखील सायरा बानो म्हणाल्या.