Actor Arjun Accident In Goa : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अर्जुन बिजलानीचा गंभीर अपघात झाला आहे. तो गोव्यात त्याची पत्नी नेहा स्वामी आणि मुलगा अयानसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेला होता. पण तिथे त्याचा अपघात झाला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यानं सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर केले आणि त्याच्या चाहत्यांना त्याविषयी माहिती दिली आहे. मात्र, इतकं असलं तरी देखील एका शोच्या शूटिंगसाठी तो मुंबईत परत आला.
अर्जुन बिजलानीनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्याला झालेल्या दुखापतीचा फोटो शेअर केला आहे. त्याच्या दोन्ही पायांना खरचटलं. दरम्यान, अर्जुनसोबत ही घटना कशी झाली त्याची माहिती समोर आलेली नाही, पम तो संपूर्ण कुटुंबासोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गोव्यात गेल्याचे मात्र यावेळी कळले. पायाला इतकी जखम झाल्यानंतरही अर्जुन हा सेटवर परतला आहे. अर्जुन सध्या 'लाफ्टर शेफ' चं शूट करत असून त्याचे अनेक व्हिडीओ त्यानं इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. त्यापैकी त्याचा हॉरर लूकही सगळ्यांना पाहायला मिळाला. दरम्यान, आता सगळेच हे अर्जुन बिजलानी या अपघाताविषयी काय अपडेट देतो यानं वेधले आहे. अनेक नेटकऱ्यांनी आणि त्याच्या चाहत्यांनी त्यांना विनंती केली आहे की त्यानं काळजी घ्यावी.
दरम्यान, या आठवड्यात लाफ्टर शेफमध्ये श्रद्धा कपूर येणार आहे. त्याचं खास कारण म्हणजे तिचा येणारा आगामी चित्रपट 'स्त्री 2'. अर्जुन बिजलानी हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्यानं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तर याशिवाय अर्जुनची सोशल मीडियावर देखील खूप चांगलीच लोकप्रियता आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 8.1 मिलियन फॉलोवर्स होते. अर्जुन बिजलानीच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्यानं हम तुम , परदेस में है मेरा दिल, नागिन, इश्क में मरजावां, रुहानियत, शिव-शक्ति, स्प्लिट्स व्हिला इंडियाज गॉट टॅलेंट आणि डान्स दिवाने सारखे अनेक शो केले आहेत.