आमीरच्या गृहप्रवेशावरून वाद, जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप

बॉलिवूड अभिनेता आमीर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या (Netizens) निशाण्यावर आलाय.   

Updated: Oct 13, 2022, 11:38 PM IST
आमीरच्या गृहप्रवेशावरून वाद, जाहिरातीत हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप title=

मुंबई : अभिनेता आमीर खान (Amir Khan) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. एका जाहिरातीमुळे आमीर खानवर सोशल मीडियातून (Social Media) जोरदार टीका होतेय. असं काय आहे या जाहिरातीत? नेटीझन्सकडून आमीरवर नेमका कोणता आरोप होतोय? पाहूयात हा रिपोर्ट  (actor amir khan aka mr perfectionist  in controversy again netizens targeted by home entry advertising)

बॉलिवूड अभिनेता आमीर खान पुन्हा एकदा नेटक-यांच्या निशाण्यावर आलाय. यावेळी कोणत्या विधानामुळे किंवा सिनेमामुळे आमीर अडचणीत आलेलं नाही तर त्याची अडचण वाढलीय ती एका जाहिरातीमुळे (प्ले जाहिरात) हीच ती जाहिरात, ज्यामुळे आमीरवर हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप होतोय. 

जाहीरातीत नक्की काय?

आमीरनं कियारा आडवाणीसोबत एका बँकेची जाहिरात केलीय. यात कियारा आणि आमीर वधू-वर दाखवण्यात आलेत. लग्नानंतर दोघेही नववधूच्या घरी येतात.घरात पहिला प्रवेश कुणी करायचा यावरून दोघांमध्ये चर्चाही रंगते. पुरूषही 'घर जावई' होऊ शकतो हे या जाहिरातीत दाखवण्यात आलंय.या जाहिरातीत हिंदू प्रथा बदलल्याचा आरोप आमिरवर करण्यात आलाय. या जाहिरातीवर मध्य प्रदेशच्या गृहमंत्र्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. 

दुसरीकडे ही जाहिरात पाहून द काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आमीर खानवर चांगलेच भडकले आहेत. असला काहीतरी मुर्खपणा करायचा आणि मग म्हणायचं हिंदू ट्रोल करतात, असं ट्विट विवेक अग्निहोत्रींनी केलंय. याआधीही असहिष्णूतेच्या मुद्द्यावरून केलेल्या वक्तव्यावरून आमीर चांगलाच अडचणीत सापडला होता. त्यात आता या नव्या वादाची भर पडलीय.