मुंबई : एमटीव्हीचा (MTV) हसल 2.0 (Hustle 2.0) या कार्यक्रम मराठी मुलींनी गाजवून टाकलाय. आर्या जाधव आणि सृष्टी तावडे (Srushti Tawade) या दोन मराठी रॅपर सध्या खुप चर्चेत आहात.या दोघीचे रॅप प्रत्येक स्मार्टफोनमध्ये वाजतायत. सध्या रॅपर सृष्टी तावडेचा 'भगवान बोल रहा हूँ...', हा रॅप खुप ट्रेंड करतोय. प्रेक्षक तिचा हा ऱॅप पुन्हा पुन्हा पाहत आहेत, इतका त्यांना तो आवडला आहे. त्यामुळे रॅपर सृष्टी तावडे (Rapper Srushti Tawade) खुपच चर्चेत आली आहे.
MTV वरील Hustle 2.0 हा शो तरुण रॅपर सृष्टी तावडेमुळे (Rapper Srushti Tawade) खूप ट्रेंड करत आहे. शोमध्ये, सृष्टी तिच्या स्वॅग आणि धमाकेदार रॅपद्वारे सर्वांना प्रभावित करताना दिसत आहे.या शोचे जज बादशाह देखील तिची जोरदार प्रशंसा करतायत. त्याचबरोबर याआधीही ती तिच्या रॅप व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.याआधी तिने कोणते रॅप साँग केलेले ते पाहूयात.'
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा Oops Moment ची शिकार, VIDEO आला समोर
सृष्टी तावडे (Srushti Tawade) जेव्हा MTV वरील Hustle 2.0 या शोचा भाग नव्हती, तेव्हा सृष्टी बर्याच ट्रेंडिंग विषयांवर रॅप लिहायची आणि व्हिडिओंमध्ये ती स्वतः सादर करताना दिसली आहे. तिच्या इंस्टाग्राम रील्सवर नजर टाकली तर तिने 'अच्छे दिन' वर टोमणा मारणारा व्हिडिओ बनवला आहे.तसेच तिने रॅपच्या माध्यमातून नेपोटिझमवरही आपले मत व्यक्त केले आहे.
हे ही वाचा : अभिनेत्री श्वेता तिवारीचा बोल्ड लुक,फोटो पाहून चाहते थक्क
दरम्यान शोबद्दल बोलायचे झाले तर, सृष्टी तावडेचे (Rapper Srushti Tawade) 'भगवान बोल रहा हूँ...' हे रॅप गाणे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे ऱॅप प्रेक्षक पुन्हा पुन्हा ऐकत आहेत, इतकं त्यांना आवडला आहे. यासह तिने छोटा डॉन, डमिस गाईड फॉर मुंबई चील किंडा गाय, मैं नहीं तो कौन असे अनेक रॅप गायले आहेत. हे ऱॅप देखील प्रेक्षकांना आवडले आहेत.