अपघाताच्या अफवांना बॉलिवूड गायकाकडून पूर्णविराम

गायक हिमेश रेशमिया अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या.

Updated: Jul 3, 2019, 08:14 AM IST
अपघाताच्या अफवांना बॉलिवूड गायकाकडून पूर्णविराम title=

मुंबई : तरूणांमध्ये लोकप्रिय असलेला गायक हिमेश रेशमिया अपघातात गंभीररित्या जखमी झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर चांगल्याच रंगल्या होत्या. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येणार नाही. 

परंतू खुद्द हिमेशने या सर्व चर्चांना पूर्णविराम लावला आहे. मुंबई-पुणे महामार्गावर त्याचा अपघात झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. त्याच्या अपघाताच्या बातम्या ऐकून हिमेशच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते.  

मंगळवारी सकाळी त्याच्या गाडीचा अपघात झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते. 'टाईम्स ऑफ इंडिया'शी संवाद साधताना त्याने काही गोष्टी स्पष्ट केल्या. 'त्यावेळेस मी कारमध्ये नव्हतो, माझा ड्रायव्हर कारमध्ये होता. त्याच्या पायला थोडी जखम झाली आहे. त्यामुळे त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याची परिस्थिती स्थिर आहे', असं तो म्हणाला. 

जखमी झालेला ड्रायव्हर आपल्या वडिलांची कार चालवत असल्याचे सांगत तो म्हणाला की, 'वडील फ्रेश होण्यासाठी कारमधून बाहेर आले होते. भरधाव वेगात आलेल्या एका कारने त्यांच्या कारला टक्कर मारली आणि झालेल्या अपघातात ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला.'

तरूणांच्या गळ्यातील ताईद असणाऱ्या हिमेशने त्याच्या आवाजाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर केले आहे. ‘आशिक बनाया आपने’, ‘झलक दिखला जा’, ‘तेरा सुरूर’ या गण्यांमुळे तरूणांनी त्याला चांगलेच डोक्यावर घेतले होते. दरम्यान, हिमेश सुखरूप असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.