...म्हणून जान्हवी, खुशीचा स्वीकार, अर्जुनचा मोठा खुलासा

श्रीदेवींच्या अचानक मृत्यूनंतर अभिनेता अर्जुन कपूरने कर्तव्यदक्ष भावाची भूमिका बजावली.

Updated: May 26, 2019, 07:13 PM IST
...म्हणून जान्हवी, खुशीचा स्वीकार, अर्जुनचा मोठा खुलासा title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये नात्यांच्या चर्चा नेहमीच रंगत असतात. काही वर्षांपूर्वी अभिनेत्री श्रीदेवी यांच्या निधनानंतर कपूर भावंडांच्या चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. श्रीदेवींच्या अचानक मृत्यूनंतर अभिनेता अर्जुन कपूरने कर्तव्यदक्ष भावाची भूमिका बजावली. कपूर कुटुंबियांच्या दुख:त अर्जुने आपल्या जबाबदारीचे चोख पालन केले. आपल्या लहान बहिणींच्या दुख:त त्याने जान्हवी आणि खुशीला मोठ्या भावाचा आधार दिला.

'इंडियाज मोस्ट वॅन्टेड' अभिनेता अर्जुन कपूरला एका मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आल्यानंतर त्याने, 'मी हे फक्त माझ्या वडिलांच्या सांगण्यावरून केले' असे तो म्हणाला. यापुढे तो म्हणाला की 'वयाच्या ३२ व्या वर्षी अचानक दोन व्यक्ती आपल्या जीवनात अशा प्रकारे पाऊल ठेवत असतील तर ते स्वीकारण्यास वेळ द्यावा लागतो. पण आता आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तेढ नाहीत. आम्ही एकत्र एका घरात राहत नसलो तरी आमच्यातलं नातं आता फार चांगलं आहे. जान्हवी आणि खुशी माझ्या आयुष्यात असल्यामुळे मी फार खूश आहे.'

जान्हवी कपूरने 'सडक' चित्रपटाच्या मध्यामातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवी आणि अर्जुन दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' या शोमध्ये एकत्र झळकले होते.

सध्या अर्जुन आणि मलायकाच्या नात्यांच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. या दोघांना अनेक पार्ट्यांमध्ये, हॉटेलबाहेर मीडियाने त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये कैद केले. एवढेच नाही तर मलायकाने एका कार्यक्रमात आपल्या नात्याचा स्वीकार देखील केला होता.