ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Abhishek Bachchan : अभिषेक बच्चननं ऐश्वर्याच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी न लावण्याचं कारण आलं समोर... 

दिक्षा पाटील | Updated: Oct 24, 2024, 01:15 PM IST
ऐश्वर्याच्या माहेरी का नाही गेला अभिषेक बच्चन? सत्य समोर येताच नेटकऱ्यांनी केलं कौतुक title=
(Photo Credit : Social Media)

Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन हा गेल्या काही दिवसांपासून सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत राहतो. ऐश्वर्या रायसोबत होणारे वाद आणि अभिनेत्री निम्रत कौरशी त्याच्या जवळीकनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. एकीकडे त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा तेव्हा वाढल्या जेव्हा ऐश्वर्या रायच्या माहेरी असलेल्या कार्यक्रमात अभिषेक सहभागी झाला नव्हता. लोकांना वाटलं होतं की त्या कार्यक्रमामध्ये अभिषेक देखील दिसणार आहे. पण असं काही झालं नाही. खरंतर या मागचं कारण काय आहे ज्यामुळे अभिषेक या कार्यक्रमात पोहोचू शकला नाही. 

खरंतर, ऐश्वर्याच्या चुलत भावाचा वाढदिवस होता. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. यात ऐश्वर्यासोबत तिची आई, भाऊ आणि वहिणी त्यांची मुलं आणि आराझ्यासोबत खूर आनंदी दिसते. अभिषेक दिसला नाही, त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा रंगली आहे.  खरं कारण तर आहे हे की तो त्याची आजी इंदिरा भादुडीला पाहण्यासाठी भोपालला गेलेला तर तिथेच तो अजूनही आहे. कारण बऱ्याच काळापासून त्या आजारी होत्या. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जया बच्चन यांची आई इंदिरा यांता मनका फ्रॅक्चर झाला आहे. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. असं म्हटलं जातं की आजीला भेटण्यासाठी आणि त्यांची काळजी घेण्यासाठी अभिषेक मध्य रात्री असलेल्या विमानानं गेला होता. 'इंडिया टुडे' च्या रिपोर्ट्सनुसार, इंदिरा भादुडी ठीक आहेत. त्यांना मनक्यात झालेलं फ्रॅक्चर हे खूप कमी होतं. हेच कारण आहे की त्या रुग्णालयात आहेत. त्या आता नीट खात-पित आहेत आणि त्यांना आता बोलताही येत आहे.  अभिषेकची आजी लवकर ठीक व्हायला हवी यासाठी त्याचे चाहते देखील प्रार्थना करत आहेत. अशात अभिषेक त्याच्या आजीची काळजी घेण्यासाठी तिथे गेल्यानं लोकं त्याची स्तुती करत आहेत. कारण दुसरीकडे त्याला ऐश्वर्याच्या कुटुंबाच्या कार्यक्रमात न दिसल्यानं त्याला ट्रोल करत होते तर आता त्याच्या अनुपस्थिती मागचं कारण समोर आलं आहे. 

हेही वाचा : इथं परफेक्शनीस्ट, तिथं साऊथ सुपरस्टार; 'गजनी 2' मध्ये कोण बाजी मारणार? एकाच्या यशाचा दुसऱ्याला फटका?

दरम्यान, असं म्हटलं जातं की गेल्या वर्षी इंदिरा भादुडी यांची मुंबईत पेसमेकर सर्जरी झाली होती आणि त्यांच्या तब्येतीला घेऊन कुटुंबात सगळ्यांची चिंता वाढली होती. एकीकडे अभिषेक त्याच्या आजीची काळजी घेत आहे तर दुसरीकडे त्यानं काल त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. 'आय वॉन्ट टू टॉक' या त्याच्या आगामी चित्रपटाचं नाव आहे. त्याशिवाय त्याचा 'बी हॅप्पी' या चित्रपटात देखील तो दिसणार आहे.