ऐश्वर्याच्या सुंदरतेमुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे अभिषेकनं केलं लग्न, अभिनेत्याकडून गौप्यस्फोट

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण...

Updated: Dec 1, 2021, 10:45 PM IST
ऐश्वर्याच्या सुंदरतेमुळे नाही, तर 'या' गोष्टीमुळे अभिषेकनं केलं लग्न, अभिनेत्याकडून गौप्यस्फोट title=

मुंबई : ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली आहेत, पण दोघांमधील प्रेम आजही पूर्वीसारखेच आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऐश्वर्या अभिषेकपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. पण या दोघांनी ही या गोष्टीला कधीच दोघांच्या नात्यात येऊ दिलं नाही. दोघेही बॉलिवूडमधील सर्वात प्रेमळ जोडप्यांपैकी एक आहेत आणि आजही हे जोडी एकमेकांच्या तितक्याच प्रेमात आहेत. एवढेच काय तर लोकांना देखील ही जोडी खूप आवडते.

अभिषेक आणि ऐश्वर्याने लोकांसमोर उदाहरण मांडले त्यावरून हेच​दिसून येते की, जगात प्रेमापेक्षा मोठे काहीही नाही. अभिषेकने एकदा एका मुलाखतीती त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जे इतर अनेक जोडप्यांसाठी एक मोठा धडा आहे.

मुलाखतीत अभिषेकने सांगितले होते की, त्याने ऐश्वर्याशी लग्न यासाठी नाही केलं की, ती खूप सुंदर आहे. तर त्याने तिच्यासोबत यासाठी लग्न केलं की, ती खूप सुंदर व्यक्ती आहे. ती मनाने शुद्ध आहे आणि हेच तिचे सौंदर्य आहे आणि म्हणूनच त्याने ऐश्वर्याला जीवनसाथी म्हणून निवडले.

अभिषेकची ही गोष्ट अनेक कपल्ससाठी एक इंस्पीरेशन आहे.

आंतरिक सौंदर्य महत्वाचे का आहे?

असे म्हणतात की, व्यक्तीचे सौंदर्य हे ठाराविक काळापर्यंत त्याच्यासोबत राहतं. परंतु एक स्वच्छ आणि सुंदर मन हे नेहमीच व्यक्तीसोबत राहतं. कोणाच्याही बाह्य सुंदरतेवर प्रेम करु नका, तर त्याच्या मनाच्या सुंदरतेवर प्रेम करा.

तुमचा जोडीदार फक्त सुंदर दिसतो म्हणून तुम्ही निवडत असाल तर ही तुमची मोठी चूक ठरू शकते. कारण जर तुम्हाला तुमच्या जोडीदारासोबत संपूर्ण आयुष्य घालवायचे असेल तर त्यांचे मनापासून सुंदर असणे खूप महत्वाचे आहे. तो तुमच्याशी कसा वागतो तसेच त्याचा इतरांबद्दलचा दृष्टिकोन किती चांगला आहे, या गोष्टी व्यक्तीला खरोखर खूप सुंदर बनवतात.

वयातील अंतर फक्त मोजणी आहे

आपण अशी अनेक जोडपी पाहिली आहेत, ज्यामध्ये बायको ही नवऱ्यापेक्षा मोठी आहे. परंतु याचा त्यांच्या आयुष्यावरती काही फरक पडत नाही. ते एकत्र आनंदी जीवन जगत आहेत, त्यामुळे जर तुम्ही एकमेकांसोबत खुश असाल, तर आणखी काय हवं? समाज काय म्हणतो याकडे लक्ष देऊ नये. तुमचे हृदय काय म्हणते? हे जास्त महत्वाचं आहे.