दहावीत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या आर्चीच्या अभिनयाला मात्र शून्य किंमत

 सैराट फेम रिंकू राजगुरू अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी एसएससी बोर्डाच्या लेखी आर्चीच्या अभिनयाला शून्य किंमत असल्याचं पुढं आलंय. 

Updated: Jun 13, 2017, 09:48 PM IST
दहावीत फर्स्ट क्लास मिळवणाऱ्या आर्चीच्या अभिनयाला मात्र शून्य किंमत title=

मुंबई :  सैराट फेम रिंकू राजगुरू अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असला तरी एसएससी बोर्डाच्या लेखी आर्चीच्या अभिनयाला शून्य किंमत असल्याचं पुढं आलंय. 

दहावीच्या परीक्षेत आर्चीला ६६ टक्के मिळाले. त्यात कला श्रेणीतल्या केवळ ५ गुणांचा समावेश आहे. तेदेखील तिला अभिनयासाठी नव्हे तर चित्रकलेसाठी देण्यात आलेले आहेत. 

बोर्डाच्या निकषावर व्यावसायिक सिनेमा कला श्रेणीत मोडत नाही. त्यामुळंच आर्चीला आणखी वीस गुणांपासून वंचित राहावं लागलंय. उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय स्तरावर अभिनयासाठी पुरस्कार मिळवणा-या बालकलाकाराला अतिरिक्त दहा गुण देण्याचा जीआर जानेवारी २०१७ मध्ये काढण्यात आलाय. 

हा जीआर मार्च २०१८ पासून लागू होणार आहे. हा जीआर यंदापासून लागू झाला असता तर आर्चीला कला श्रेणीत आणखी दहा गुण मिळाले असते.