Amitabh Bachchan bankruptcy : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गेले 4 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवलं. उतरत्या वयात देखील त्यांच्या अभिनयाची कला आणखी कोरली जातीये. त्यांच्या चित्रपटामधून याचा प्रत्यय सर्वांना येतो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या दिलखुलास मैत्रीसाठी देखील ओळखले जातात. मात्र, काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला केलं. असं काय घडलं होतं? ज्यामुळे त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला.
'वागळे की दुनिया' मधून स्टार बनलेल्या अंजन श्रीवास्तव यांनी चित्रपटसृष्टीत नाव कमवलं. अंजन श्रीवास्तव (Aanjjan Srivastav) यांची अमिताभ बच्चन यांच्याशी घट्ट मैत्री होती. दोघं एकदम जिवाभावाचे मित्र... मात्र, कौन बनेगा करोडपतीनंतर दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला अन् हळूहळू अमिताभ बच्चन यांनी सर्व मित्रांना साईड लाईन केलं. अंजन श्रीवास्तव यांनी बच्चन यांच्या परिस्थितीवर 'राजश्री अनप्लग्ड'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं.
मी फिल्मिस्तानमधील 'तूफान'च्या सेटवर भेटलो त्यावेळी अमितजींची परिस्थिती खूपच खराब होती. कोलकात्यात त्यांच्या विरोधात प्रचंड आंदोलन सुरू होती. एवढंच काय तर त्यांचे पोस्टर फाडले जात होते. त्यावेळी ते फार दु:खी होते. मी त्यांना विचारलं कसा आहेस, त्यावेळी त्यांनी मी ठीक आहे, असं खालच्या सुरात सांगितलं. बच्चन यांना विचारणारं कोणी नव्हतं. वडिलांच्या मित्रांनी काहीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. या परिस्थितीतून बाहेर पडत नाही, तोपर्यंत त्यांचा अपघात झाला. मी दररोज अमिताभसाठी तिथं असायचो. अमितजी माझ्यासाठी चांगले व्यक्ती होते, असं अंजन श्रीवास्तव सांगतात.
चुकीच्या बँक स्टेटमेंटमुळे अमिताभ बच्चन वाईट परिस्थितीमध्ये अडकले होते. एबीसीएल खात्यात घोळ झाला होता. लोक त्यांची खुलेआम फसवणूक करत होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल करू नका, असं मी व्यवस्थापकांना सांगितलं होतं. मी अमिताभ यांना भेटण्यासाठी गेलो तेव्हा बच्चन साहेबांनी माझ्यासमोर चक्क हात जोडले. मी शक्य तेवढ्या लवकर तुमचे पैसे परत करेन, असं त्यांनी मला सांगितलं. त्यावेळी मी त्यांना धीर दिला. मी तुमच्याकडे पैसे परत घेण्यासाठी आलेलो नाही. तुम्हाला शक्य असेल तेव्हा माझे पैसे परत करा, असं मी त्यांना तेव्हाच सांगितलं होतं. मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारची कारवाई करू नका, असं मी मॅनेजमेंटला सांगितलं होतं, असंही अंजन श्रीवास्तव म्हणतात.
दरम्यान, बच्चन आर्थिक संकटामुळे खूप निराश झाले होते. कौन बनेगा करोडपतीच्या यशानंतर बिग बी कर्जमुक्त झाले. आणि कार्यक्रम देखील चांगलाच चालला, असं अंजन श्रीवास्तव म्हणतात. पूर्वी जयाजी मला फोन करत होत्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत होळी साजरी करण्यासाठी आमंत्रित करत होत्या. मात्र, नंतर त्यांनी सर्वांशी नातं तोडलं. कोणीतरी त्यांना भडकवलं होतं आणि ते रंगभूमीवरचे कलाकार होते, असंही अंजन श्रीवास्तव यांनी सांगितलं होतं.