आमिरची मुलगी इराचे बॉलिवूडमध्ये पदार्पण...

मुंबई : अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या वाटेवर असताना त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 11, 2017, 10:08 AM IST
आमिरची मुलगी इराचे बॉलिवूडमध्ये पदार्पण...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अनेक स्टार किड्स बॉलिवूडमध्ये पदार्पणाच्या वाटेवर असताना त्यात अजून एका नावाची भर पडली आहे. म्हणजेच सैफ अली खानची मुलगी सारा, श्रीदेवीची मुलगी जान्हवी यांच्या पदार्पणाच्या चर्चा रंगल्या असताना  त्यात त्यांच्या पंगतीला अजून एक नाव जोडले गेले आहे ते म्हणजे आमिर खानची मुलगी इरा. परंतु, इरा अभिनयात नाही तर चित्रपट निर्मितीत आपले आपले नशीब आजमावणार आहे. यासाठीच तिची सध्या तयारी सुरु आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक राम माधवानी यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये इरा चित्रपट निर्मितीचे धडे गिरवत आहे. या प्रॉडक्शन हाऊसमध्ये चित्रपट, जाहिराती आणि वेगवेगळ्या शोजच्या निर्मितीचं काम पाहिलं जातं. इरा सध्या गौतम बुद्ध यांच्या जीवनावर आधारित चित्रपटासाठी काम करत असलेल्या टीमध्ये सहभागी आहे. 

तिच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे स्टार किड असल्याचा अटिट्यूट न दाखवता ती टीमसोबत सहज मिसळते, अशी माहिती टीममधील सूत्रांकडून हाती आली आहे. त्याचबरोबर आमिर खानचा मुलगा जुनैदसुद्धा आमिर ‘पीके’ चित्रपटापासून दिग्दर्शक राजकुमार हिरानीसोबत काम करतोय.