आमीर खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर

देणार गोडसरप्राईज 

आमीर खानच्या चाहत्यांसाठी खुशखबर  title=

मुंबई : आठ वर्षांपूर्वी रिलीज झालेला आमीर खानचा धमाकेदार '3 इडियट्स' या सिनेमाला प्रेक्षकांनी भरपूर पसंद केलं. आजही 3 इडिएट्स हा सिनेमा प्रेक्षक आवर्जून पाहतात. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कलेक्शन केलं. या सिनेमाने जगभरात 3मिलियनहून अधिक कमाई केली आहे. आता आमीर खानच्या चाहत्यासाठी अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार लवकरच 3 इडिएट्सचा सीक्वल येत आहे. 2009 मध्ये रिलीज झालेल्या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं होतं.या सिनेमांत इंजिनिअरिंगचा अभ्यास करणाऱ्या 3 जिगरी मित्रांची गोष्ट सांगण्यात आली आहे. रेंचो, फरहान आणि राजू अशी या तिघांची गोष्ट आहे.  

मिड डे दिलेल्या मुलाखतीत राजकुमार हिरानी यांनी इशारा दिला आहे की, ते 3 इडिएट्स या सिनेमाचा सिक्वल करणार आहे. त्यांना विचारलेल्या प्रश्नात ते म्हणाले की, नक्कीच 3 इडिएट्सचा सिक्वल बनवणं माझ्या डोक्यात आहे. अभिजात जोशी आणि मी काही दिवसांपूर्वी याची स्टोरी लिहायला सुरूवात केली आहे. मात्र आता हा सिनेमा अगदी सुरूवातीच्या काळात आहे. स्क्रिप्ट डेव्हलप करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ लागणार आहे. 

तर सुत्रांनी अशी देखील माहिती दिली आहे की, राजकुमार हिरानी मुन्नाभाई 3 देखील करत आहे. या सिनेमाचं काम सुरू केलं असून मुन्नाभाई 3 ची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. राजकुमार हिरानी यांचा संजू हा सिनेमा 29 जून 2018 रोजी सिनेमाघरात रिलीज होणार आहे. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या बायोपिकची सर्वच चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.