Aamir Khan नं Ex-Wife किरण राव सोबत हिंदू परंपरेनं केली पूजा, Photo Viral

Aamir Khan आणि किरण रावचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Updated: Dec 9, 2022, 12:46 PM IST
Aamir Khan नं Ex-Wife किरण राव सोबत हिंदू परंपरेनं केली पूजा, Photo Viral  title=

Aamir Khan Performed Puja With Kiran Rao at His Office : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. नुकताच आमिर आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव (Aamir Khan's Ex-Wife Kiran Rao) यांनी नुकतीच आमिर खान प्रॉडक्शनच्या कार्यालयात हिंदू रितीरिवाजांनुसार पूजा केली. आमिरने सर्व पूजाविधी पार पाडल्या आणि किरण राव देखील आरतीमध्ये सहभागी झाली होती. यादरम्यान आमिर आणि किरण दोघांनी एकत्र आरती केली. त्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. 

आमिर आणि किरणचे हे फोटो लाल सिंह चड्ढा या चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केल आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमध्ये आमिरनं स्वेटशर्ट आणि डेनिम जीन्स परिधान केली होती. आमिरच्या गळ्यात उपरण आणि टोपी घातली आहे.  एका फोटोत पूजे दरम्यान, आमिरनं यावेळी कलश पूजा केल्याचे दिसत आहे. दरम्यान, आमिरसोबत पूजेला त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव देखील दिसत होती. तर किरणच्या हातात पूजाचा ताट असल्याचे दिसत आहे. पूजे दरम्यान, किरणनं डेनिम आणि निळ्या रंगाची जिन्स परिधान केली आहे. 

पाहा आमिरचे फोटो -

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

अद्वैत चंदनने शेअर केलेल्या पोस्टमध्ये ही पूजा आमिर खान प्रॉडक्शनच्या ऑफिसमध्ये का ठेवण्यात आली या मागचं कारण सांगितलेले नाही. मात्र फोटोंमध्ये तेथे उपस्थित असलेले सगळेच आनंदी दिसत आहेत. आमिरबद्दल बोलायचं झालं तर काही दिवसांपूर्वी तो अभिनयातून ब्रेक घेत असल्याचं म्हणाला होता. पुढच्या दीड ते दोन वर्षानंतर अभिनय क्षेत्रात परतणार असल्याचं त्याने म्हटलं. मात्र, यादरम्यान तो निर्माता म्हणून काम करत राहणार आहे.

हेही वाचा : 'माझ्या कुटुंबाला...', विकीसोबत Secret Wedding करण्यावर Katrina चा खुलासा

आमिर आणि किरण यांनी लग्नाला 15 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घटस्फोट घेतला. ते दोघेही मिळून आता त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाचे आझाद राव खानचे पालन करत आहेत. घटस्फोटानंतरही आमिर आणि किरण चित्रपट पार्ट्या, विमानतळ किंवा अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आमिरचा 'लाल सिंग चढ्ढा' प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकला नाही. (aamir khan kalash puja in his office performs aarti with ex wife kiran rao photo viral)