VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता...

Aamir Khan- Kiran Rao : आयरा खानच्या लग्नाच्या कार्यक्रमाला झाली सुरुवात, आमिर खान आणि किरण राव यांनी केला भन्नाट डान्स

दिक्षा पाटील | Updated: Jan 8, 2024, 01:43 PM IST
VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता... title=
(Photo Credit : Social Media)

Aamir Khan- Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी नोंदनी पद्धतीनं विवाह केला. आता या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच लग्न बंधनात अडकलेल्या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर हे जोडप आता उदयपुरमध्ये शाही विवाह करणार आहेत. आयरा-नुपूरशिवाय त्यांचे मित्र सोशल मीडियावर याची झलक दाखवत आहेत. आता सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत असून आमिर खान आणि किरण राव आणि संपूर्ण कुटुंब हे प्री-वेडिंग कार्यक्रम आनंदानं साजरा करत आहेत. 

या व्हिडीओत आमिर खानसोबत त्याचा मोठा मुलगा जुनैद खान, पहिली पूर्वाश्रमीची पत्नी रीना दत्ता आणि दुसरी पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव सगळे दिसतायत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमिर हा सगळ्यात आधी त्याचा मुलगा जुनैदला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत असतो. त्यानंतर तो स्वत: त्याच्या दोन्ही पत्नींसोबत नाचू लागतो. या दरम्यान, तो जेव्हा जुनैदला डान्स करण्यासाठी बोलवतो, तर तो पळून जाण्याचा प्रयत्न करतो. 

सोशल मीडियावर आमिरच्या संपूर्ण कुटूंबाचा व्हिडीओ व्हायरल होताय. हे व्हिडीओ लोक गायिका आशु शर्मा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या व्हिडीओत आमिर रीना दत्ता आणि किरण रावसोबत डान्स करताना दिसत आहे. त्याशिवाय तो कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या अतिथींचे स्वागत करताना दिसत आहे. तर या व्हिडीओत आमिर आणि किरण राव यांचा मुलगा आजाद देखील दिसत आहे. तो देखील त्याच्या बहिणीच्या लग्नाच्या आधीच्या कार्यक्रमात मज्जा करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

दरम्यान, या आधी आयरा खाननं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती तिचा पती नुपूर शिखरेसोबत दिसत आहे. पण सगळ्यात लक्ष वेधी गोष्ट म्हणजे, लग्नाच्या कार्यक्रमांचा आनंद घेत ती तिच्या फिटनेसवर देखील लक्ष देत आहे. त्यात ती जीममध्ये वर्कआऊट करताना दिसते. हे फोटो शेअर करत आयरानं कॅप्शन दिलं की 'खूप वर्क आऊच केल्याशिवाय आमचं लग्न होऊ शकतं का?'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : VIDEO : 'राजसाहेब गाडीतून उतरले अन्...', सिद्धार्थ जाधवनं शेअर केला टोलनाक्यावरचा 'तो' अनुभव

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयरा खान आणि नुपूर शिखरे विधीनुसार लग्नाच्या सगळे कार्यक्रम काल 7 जानेवारी पासून सुरु झाले आहेत. या दोघांच्या लग्नात बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित असतील. यानंतर आमिर मुंबईत लेक आयराच्या लग्नाचं रिसेप्शन 13 जानेवारी रोजी देणार आहे. त्यात अनेक सेलिब्रिटी हजेरी लावण्याची शक्यता आहे.