आमिर - करीनाच्या 'त्या' फोटोंमुळे चाहते हैराण, चाहत्यांना विश्वासच बसेना

आमिरला अशा अवस्थेत पाहून चाहते हैराण, अभिनेत्याने असं केल तरी काय? पाहा फोटो  

Updated: Jul 29, 2022, 08:07 AM IST
आमिर - करीनाच्या 'त्या' फोटोंमुळे चाहते हैराण, चाहत्यांना विश्वासच बसेना title=

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता अमिर खान सध्या आगामी 'लाल सिंग  चड्ढा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सर्वत्र सिनेमाची चर्चा सुरू असताना आमिर आणि करीनाचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेले फोटो दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 7'च्या शोमधील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे चाहत्यांना देखील 'कॉफी विथ करण 7'च्या आगामी भागाची प्रतीक्षा आहे. 

दरम्यान, करीनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये अभिनेत्रीने ‘मला माझी ब्लॅक कॉफी आवडते’, असं लिहून तिने या शोमध्ये दिसणार असल्याचा इशारा दिला होता.  आता 'कॉफी विथ करण 7'च्या आगामी भागाक आमिर आणि करीना दिसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

शोच्या आगामी भागाची चर्चा रंगत असताना करीना आणि आमिरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये करीना आणि करण गप्पा मराताना दिसत आहे, तर दुसरीकडे आमिर खान सिगार पेटवताना दिसत आहे. 

सध्या आमिरच्या फोटोंमुळे सर्वत्र उधाण आलं आहे. करीना आणि आमिरच्या सिनेमाबद्दल सांगायच झालं तर,  ‘लाल सिंह चड्ढा’ सिनेमा 11 ऑगस्ट 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. यात मोना सिंग, नागा चैतन्यसह अनेक कलाकार आहेत.