मुंबई : अभिनेत्री आमना शरीफ पुन्हा अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवणार आहे. एकेकाळी रोमँटिक भूमिकेत दिसणारी आमनाच्या हातात आता बंदूक दिसणार आहे. 'कसौटी जिंदगी की 2' अशा अनेक मालिकांमध्ये काम करणारी आमना आता OTT प्लॅटफॉर्मवर परतणार आहे. आमना 'डॅमेज्ड' या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
एका मुलाखतीत आमनाने तिच्या प्रोजेक्टबद्दल मोकळेपणाने सांगितले. 'मी नुकताच 'कसौटी जिंदगी की 2' मध्ये काम केलं. नंतर ब्रेक घेतला. आता तुम्ही मला स्क्रीनवर पाहू शकाल. सीरीजमध्ये माझी भूमिका केवळ एका कणखर पोलीस अधिकाऱ्याचीच नाही तर, ग्रे शेडची भूमिका देखील मी साकारणार आहे.'
ती पुढे म्हणाली, 'कारण पुढच्या भूमिकेसाठी मला स्वतःला तयार करायचं होतं. पोलीसाची भूमिका साकारण्यासाठी मी अनेक चित्रपट, मुलाखती पाहिल्या. सीरिजमध्ये असे अनेक सीन आहेत ज्यात मी अशी बंदूक वापरली आहे. आतापर्यंक बंदूक मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही वापरली नाही.'
दिग्दर्शकांनी दिलेला सल्ला देखील आमनाने यावेळी सांगितला, 'दिग्दर्शकांनी मला एक बंदूक दिली. त्या बंदूकीला आयुष्याचा एक भाग समजून घे, असं देखील ते मला म्हणाले. त्यामुळे जेव्हा मी सेटवर जाईल तेव्हा हातात बंदूक बाळगणं मला कठीण वाटणार नाही...'
आमनाने सांगितले की, तिने आयुष्यात कधीही शिव्या दिल्या नाहीत, म्हणून तिला यासाठी एक वर्कशॉपही घ्यावा लागला जेणेकरून शिव्या पडद्यावर खऱ्या दिसतील. सध्या सर्वांना आमनाच्या आगामी वेब सीरिजची प्रतीक्षा आहे.