मुलीने बुर्खा घतल्यामुळे रेहमान झाले ट्रोल

बुर्खा घालने अथवा न घालने हे खातिजाच्या आवडीवर अवलंबून आहे. पण या फोटोला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. 

Updated: Feb 9, 2019, 03:52 PM IST
मुलीने बुर्खा घतल्यामुळे रेहमान झाले ट्रोल title=

मुंबई: संगीतकार ए.आर.रेहमान यांच्या मुलीने एका कार्यक्रमात बुर्खा घातल्यामुळे खातिजा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. नुकताच स्लमडॉग मिलिनेअरला एक दशक पूर्ण झाल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात खातिजा बुर्खा घालून आली होती. कार्यक्रमात खातिजाने वडीलांसाठी भावनात्मक भषणही केले. पण खातिजा बुर्खा घालून आल्यामुळे ए.आर.रेहमान यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. त्यानंतर रेहमानने सोशल मीडिया अकाऊंटवर एक फोटो शेअर करत म्हणाले बुर्खा घालने अथवा न घालने हे खातिजाच्या आवडीवर अवलंबून आहे. पण या फोटोला देखील नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. नेटकऱ्याच्या ट्रोलवर खुद्द खालीजाने खुलासा केला आहे, 'मला बुर्खा घालण्यासाठी कोणीही आग्रह करत नाही, जर मी बुर्खा घालते तर ती माझी आवड आहे. मी सज्ञ आहे मला कळतं काय घलावं आणि काय नाही.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Raheema Khatija and Ameen posing for Hello magazine 

A post shared by @ arrahman on

 

या विवादानंतर रेहमानने आपल्या तीन मुलांचा फोटो इंन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. फोटोत खालीजा खूर्चीत बसलेली दिसत आहे तर रहिमा आणि आमीन तिच्या दोन्ही बाजूला उभे आहेत. एका मासिकासाठी हे फोटोशूट करण्यात आले होते. सध्या हा फोटो फार मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. काही तासांमध्ये 3 लाखांपेक्षाही जास्त लाइक्स फोटोला आले आहेत.