कान फेस्टिव्हलला सुरुवात, तीन मराठी चित्रपट होणार प्रदर्शित

७४ व्या कान फिल्म फेस्टीव्हलला आता सुरूवात झाली आहे

Updated: May 17, 2019, 07:41 AM IST
कान फेस्टिव्हलला सुरुवात, तीन मराठी चित्रपट होणार प्रदर्शित  title=

नवी दिल्ली : ७४ व्या कान फिल्म फेस्टीव्हलला आता सुरूवात झाली आहे. हॉलिवूडच्या कलाकारांची मांदियाळी असणाऱ्या कानच्या रेडकार्पेटवर बॉलिवूडचे काही ग्लॅमरस चेहरेही झळकणार आहेत. मराठी रसिकांसाठीही कान महोत्सव आनंदाची बातमी देत आहे. 3 मराठी चित्रपट कान बझारमध्ये प्रदर्शित होणार आहेत. ११ दिवसांच्या या सोहळ्यात, ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, दिपिका पदुकोण, कंगना राणौत, सोनम कपूर, ह्युमा कुरेशी आणि हिना खान हजेरी लावणार आहे. 

दरम्यान, दिपिका पदुकोण हिने आपला रेड कार्पेटवरचा जलवा दाखवला असून, २०१० पासून दिपिका कान फिल्म फेस्टीवलमध्ये सहभागी होत आहे. तर प्रियांका चोप्राने पहिल्यांदाच या सोहळ्याला हजेरी लावली आहे. या सोहळ्याला मराठीचा झेंडा दिमाखानं फडकणार आहे. दिठी, बंदीशाळा आणि आरॉन हे चित्रपट कान बझारमध्ये विशेष चित्रपट म्हणून प्रदर्शित होणार आहेत.