मुंबई : सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. प्रत्येक जण सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक स्टार आहेत जे सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतात. पण या अभिनेत्यांचा विनामेकअप चेहरा पाहिला तर तुम्हाला मोठा धक्का बसेल. अभिनेता अजय देवगन देखील हँडसम दिसण्यासाठी मेकअपचा वापर करतो. अजय देवगन बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक आहे. अजयने त्याच्या फिल्मी करियरची सुरूवात 1991 साली प्रदर्शित झालेल्या ‘फूल और कांटे’ च्या माध्यमातून केली.
अजय देवगन
अजयने त्याच्या करियरमध्ये अनेक हीट चित्रपट आपल्या नावावर केले आहेत. आता 51 वर्षांचा अजय मेकअपच्या जोरावर हँडसम दिसतो. पाहा कसा दिसतो अजय विनामेकअप....
सलमान खान
सलमान खान 55 वर्षांचा आहे. पण सलमानच्या फिटनेसला पाहून कोणालाचं विश्वास बसणार नाही, की सलमान 55 वर्षांचा आहे. सलमान देखील मेकअपच्या जोरावर हँडसम दिसतो.
रजनीकांत
तामिळ चित्रपटात काम करणारे सुपरस्टार रजनीकांत जगाला माहित आहे. रजनीकांत याचं लहानपणीतं नाव शिवाजी गायकवाड असं आहे. त्यांच्या वडिलांचं नाव रामोजी राव गायकवाड होतं ते एक हवलदार होते. आज वयाच्या 69व्या वर्षी रजनीकांत मेकअपमुळे हँडसम दिसतात.
अक्षय कुमार
अक्षय कुमार मेकअपमुळे हँडसम दिसतो, पण खऱ्या आयुष्यात मात्र तो इताक सुंदर दिसत नाही. अक्षयच्या हँडसम चेहऱ्यामागे फक्त आणि फक्त मेकअप आहे.
शाहरूख खान
रूपेरी पडद्यावर शाहरूख जरी हँडसम दिसत असला तरी त्याच्या हँडसम चेहऱ्यामागे फक्त आणि फक्त मेकअप आहे.