४ वर्षांच्या मुलीच्या आवाजातील या गाण्याने इंटनेटवर घातला धुमाकूळ...

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगनच्या बादशाहो सिनेमातील मेरे रश्के कमर गाणे खूप लोकप्रिय झाले. 

Updated: May 11, 2018, 03:25 PM IST
४ वर्षांच्या मुलीच्या आवाजातील या गाण्याने इंटनेटवर घातला धुमाकूळ... title=

मुंबई : गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या अजय देवगनच्या बादशाहो सिनेमातील मेरे रश्के कमर गाणे खूप लोकप्रिय झाले. १९८८ मध्ये नुसरत फतेह अली खानने हे गाणे गायले होते. मात्र सध्या इंटरनेट वर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात एका ४ वर्षांच्या मुलीने तिच्या खास अंदाजात हे गाणे गायले आहे. तिचा आवाज ऐकून तुम्ही दंग व्हाल.

मिळाले इतके व्हिव्यूज

Dhun Music नावाच्या एक युट्युब चॅनलवरुन हा व्हिडिओ गेल्या महिन्याच्या २२ तारखेला अपलोड करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत व्हिडिओला एकूण 2,835,631 व्हियूज मिळाले आहेत. तर १३०० लोकांना या व्हिडिओवर कमेंट्स केल्या आहेत. सर्व लोकांनी त्या मुलीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओला १३००० हुन अधिक लाईक्सही मिळाले आहेत.

गाणे रिक्रिएट करण्यात आले

नुसरत फतेह अली खानचे मेरे रश्के कमर हे गाणे बादशाहो सिनेमात रिक्रिएट करण्यात आले. ते राहत फतेह अली खानने गायले आहे. या गाण्याचे अनेक व्हर्जन्सही आले आहेत.