मुंबई : 90 च्या दशकात असे अनेक चित्रपट होते जे प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्या काळात काही लव्ह ड्रामा ब्लॉकबस्टर ठरले. असाच एक चित्रपट होता 'राजा हिंदुस्तानी'. करिश्मा कपूर आणि आमिर खान स्टारर या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर खळबळ उडवून दिली होती. जेव्हा-जेव्हा या चित्रपटाची चर्चा होते तेव्हा-तेव्हा या सिनेमातील किसिंग सीनची सर्वात जास्त चर्चा होते. चित्रपटाचे दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी अलीकडेच या सीनबद्दल काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत.
'राजा हिंदुस्तानी' चित्रपटातील किसींग सीन आजही सर्वात रोमँटिक सीनमध्ये गणला जातो. हा सीन शूट करणं करिश्मा कपूर आणि आमिर खानसाठी सोपं नव्हतं. या सीनच्या शूटिंगदरम्यान 47 रिटेक करण्यात आले होते. या सिनेमातील 1 मिनिटाच्या सीनमध्ये बबिताची मुलगीही सेटवर होती.
'राजा हिंदुस्तानी' हा चित्रपट १५ नोव्हेंबर १९९६ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करिश्मा आणि आमिर मुख्य भूमिकेत होते. या लव्ह ड्रामाचं बजेट 5.75 कोटी रुपये इतकं होतं आणि त्यातून 76.34 कोटी रुपयांची कमाई झाली. हा त्या काळातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांपैकी एक होता.
चित्रपटात करिश्मा कपूर पालनखेतला जाते आणि यादरम्यान तिची भेट राजा म्हणजेच आमिर खानशी होते. करिश्मा आमिरच्या स्वभावावर प्रभावित होते आणि त्याच्या प्रेमात पडते, त्यानंतर चित्रपटाची कथा अनेक वळणं घेते. चित्रपटात आमिर आणि करिश्मावर एक लिपलॉक सीन शूट करण्यात आला होता. अलीकडेच दिग्दर्शक धर्मेश दर्शनने रेट्रो वेव्हजला दिलेल्या मुलाखतीत या किसिंग सीनचा उल्लेख केला होता.
धर्मेशच्या म्हणण्यानुसार, 'करिश्मा सेटवर खूप उत्साही होती आणि तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक होती. जेव्हा किसिंग सीन आला तेव्हा त्याबद्दल बोलायलाही तिला संकोच वाटत होता. करिश्मा लहान होती आणि तिने कधीही किसिंग सीन दिला नव्हता.
धर्मेश पुढे म्हणाला, 'मी बबिताजींना फोन करून संपूर्ण सीन समजावून सांगितला. मला माहित होतं की, फक्त आईच तिच्या मुलीला हे सीन नीट समजावून सांगू शकते. या सीनच्या शूटिंगदरम्यान तिन दिवस बबिताजी तिच्यासोबत राहिल्या कारण मी त्यांना जाऊ दिलं नाही. करिश्माने तिच्या एका मुलाखतीत सांगितलं होतं की, हा सीन फेब्रुवारीमध्ये उटीमध्ये शूट करण्यात आला होता आणि हा सीन 3 दिवस चालला होता. मी आणि आमिर हा सीन संपण्याची वाट पाहत होतो.