अवघ्या काही दिवसातचं 'पुष्पा 2'ने चित्रपटाने 800 कोटींच्या कमाईचा टप्पा गाठला आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत असतानाच, रश्मिकाच्या आगामी चित्रपटाची मोठी घोषणा करण्यात आली आहे. 'द गर्लफ्रेंड' या चित्रपटात रश्मिका मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
'द गर्लफ्रेंड' चा टीझर आज प्रदर्शित होणार
रश्मिकाचा 'द गर्लफ्रेंड' हा चित्रपट राहुल रवींद्रन दिग्दर्शित करत आहेत. या चित्रपटाचा टीझर 9 डिसेंबरला म्हणजेच आज प्रेक्षकांच्या पाहाता येणार आहे. यामध्ये एक खास गोष्ट म्हणजे, रश्मिकाच्या कथित बॉयफ्रेंड विजय देवरकोंडाने टीझरला आपला आवाज दिला आहे. निर्मात्यांनी स्पष्ट केलं आहे की, विजय देवरकोंडा हा टीझरच्या माध्यमातून 'द गर्लफ्रेंड' ची ओळख जगासमोर सादर करणार आहे. चाहत्यांनी या चित्रपटाबद्दल टीझरवर भरभरुन कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
रश्मिका पहिल्यांदाच सिंगल लीडमध्ये
'द गर्लफ्रेंड' हा रश्मिकाच्या करिअरमधील हा पहिला सिंगल लीड चित्रपट आहे. ज्यामुळे हा तिच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. रोमँटिक ड्रामा शैलीतील हा चित्रपट एका लेखिकेच्या जीवनावर आधारित आहे. टीझर मल्याळमसह पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणार असून, चित्रपटातील रश्मिकाचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आकर्षित करेल. महेश बाबू, अल्लू अर्जुन आणि रणबीर कपूर यांसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केलेली रश्मिका आता एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/ranbir-kapoor-for-the-fi...
रश्मिकाचा वर्कफ्रंट
रश्मिकाने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत ज्यामुळे तिची प्रसिद्धी रातोरात वाढत गेली. 'पुष्पा 2' या चित्च्यारपटाच्या यशाचा आनंद घेत असलेली रश्मिका लवकरच अनेक चित्रपटांमुळे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. रश्मिका, विकी कौशलसोबत 'छावा' या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे, जो 'छत्रपती संभाजी महाराज' यांच्या जीवनावर आधारित आहे. तसेच ती आयुष्मान खुरानासोबत 'थामा' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे.याशिवाय, सलमान खानसोबत 'सिकंदर' चित्रपटातही ती महत्त्वाची भूमिका साकारत आहे.
रश्मिका मंदानाच्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. 'द गर्लफ्रेंड' चित्रपट तिच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव देईल, अशी अपेक्षा आहे.