Isha Ambani Sold Her Hous for 500 Cr: देशातील सगळ्यात श्रीमंत असलेल्या मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीनं अमेरिकेत असलेल्या आलिशान घर विकलं आहे. ईशानं अंबानीनं प्रेग्नंसीच्या काळात तिचा वेळ कुठे घालवला असेल तर तो याच घरात आहे. हेच घर आता तिनं 500 कोटींसाठी विकलं असून हे घर लोकप्रिय कपल जेनिफर लोपेज आणि बेन एफ्लेक यांनी खरेदी केलं आहे. दरम्यान, या घरात असं काय होती की ते घर त्यांनी इतक्या कोटींना खरेदी केलं.
ईशा अंबानीचं घर अमेरिकेच्या लॉस एंजेल्सच्या उच्चभ्रू वसती असलेल्या बेवर्ली हिल्समध्ये स्थित आहे. ईशानं हे घर 500 कोटींसाठी विकलं आहे. या घरात ईशा आणि त्यांची आई नीता अंबानी देखीलसोबत राहिली होती. ईशा अंबानीच्या या घरात 12 बेडरुम, 24 बाथरुम, इंडोर पिकलबॉल कोर्ट, जिम, सलून, स्पा, 155 फूट लांब पूर आणि इतर काही आधुनिक सुविधा आहेत.
जेनिफल लोपेजनं हे घर खरेदी केल्यामुळे त्याविषयी आणखी चर्चा रंगली आहे. या घरात सगळ्या लग्झरी सुविधा आहेत. या घराच्या बाहेर मनोरंजन पवेलियन, किचन आणि लॉन सारख्या अनेक सुविधा आहेत.
ईशा अंबानी आणि आनंद पीरामल ह 2018 मध्ये विवाह बंधनात अडकले होते. जेनिफर लोपेजनं हे घर खरेदी केलं आहे. इथे एका पेक्षा एक घरं असून हे घर 38,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलं आहे. या प्रॉपर्टीमध्ये 12 बेडरुम आणि 24 बाथरुम आहेत. हा बंगला पाहणारे लोक बंगला पाहत राहतात.
जेनिफर लोपेजनं बेन एफ्लेकशी 2022 मध्ये चौथं लग्न केलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर लोपेज ही स्वत: अब्जाधीश आहे. जेनिफर जवळ 3332 कोटींची संपत्ती आहे. जेनिफरनं तिच्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. अमेरिकीची डान्सर आणि गायिका जेनिफर लोपेजचे चाहते हे भारतात मोठ्या संख्येनं राहतात.
हेही वाचा : 'झाडांमध्ये जाऊन कपडे बदलावे लागायचे', मोठ्या अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
दरम्यान, आनंदच्या आई-वडिलांनी ईशा अंबानीला लग्नात भेट वस्तू म्हणून मुंबईत एक सी-फेसिंग घर भेट म्हणून केलं होतं. हा बंगला कोणत्या महालापेक्षा कमी नाही. हे घर 3 डी डायमंड थीमनं डिझाइन करण्यात आलं आहे. त्याचं नाव गुलिता आहे. गुलिता हा बंगला बाहेरून देखील तितकाच सुंदर दिसतो. या बंगल्याची किंमत ही जवळपास 500 कोटींच्या आसपास आहे. या बंगल्यात तीन बेसमेंट, अनेक डायनिंग रुम आणि एक आउटडोर स्विमिंग पूल आणि एक मोठा हॉल आहे.