मुंबई : पीएफ अर्थातच भविष्य निर्वाह निधीचे महत्त्व नोकरदार वर्गाशिवाय दुसरे कोण सांगणार? अनेक नोकरदार व्यक्ती वारंवार आपला पीएफ ऑनलाईन पद्धतीने चेक करतात. पण, अनेकदा इंटरनेटच्या तक्रारीमुळे ईपीएफ चेक करण्यात अडथळा येतो. म्हणूनच वापरा एक हटके ट्रीक आणि ईपीएफ चेक करा अवघ्या ६० सेकंदात.
भारताला डिजिटल इंडिया बनविण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. पण, अनेकदा मोबाईल टॉवर घराजवळ असूनही आपल्याकडे इंटरनेट कनेक्ट होत नाही.
अशा वेळी तुम्हाला जर तुमचा ईपीएफ बॅलन्स चेक करायचा असेल तर फार काळजी करू नका. इंटरनेट बंद असतानाही तुम्ही तुमचा ईपीएफ चेक करू शकता. ऑफलाईन पद्धतीने ईपीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी पुढील दोन पद्धती वापरा...
इंटरनेटचा वापर न करता आपला ईपीएफ चेक करण्यासाठी आपल्या रिजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 क्रमांकावर मिसकॉल द्या. तुमचा फोन नंबर जर ईपीएफओकडे रजिस्टर असेल तर, तुम्हाला फार काळ वाट पाहण्याची गरज नाही.
मिसकॉल दिल्यावर काही सेकंदातच तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस येईल. ज्यात तुमचा बॅलन्सची रक्कम दिसेल.
ईपीएफओ केवळ मिसकॉल किंवा ऑनलाईनच नव्हे तर, एसएमएसच्या माध्यमातूनही बॅलन्स कळवते. एसएमएसच्या माध्यमातून तुम्हाला जर ईपीएफ बॅलन्स जाणून घ्यायचा असेल तर, 07738299899 या नंबरवर एसएमएस करा. पण, ही सुविधा केवळ अशा लोकांसाठी कार्यन्वीत आहे. ज्यांनी यूएएन सुविधा अॅक्टिवेट केली आहे.
एसएमएस पाठवताना तुमच्या मेसेज बॉक्समध्ये EPFOHO UAN असे लिहा. त्याच्यापूढे तुम्ही ज्या भाषेत माहिती घेऊ इच्छिता त्या भाषेची पहिली ३ अशरे लिहा. उदा. EPFOHO UAN ENG असे लिहून 07738299899 या नंबरवर एसएमएस पाठवा. ही सेवा सर्वा भाषेत उपलब्ध आहे.
कदाचीत तुम्हाल कल्पना नसेल पण, कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे (ईपीएफओ) चार कोटींहून अधिक सदस्य आपल्या ईपीएफओ खात्यातून आजारवरील उपचार, अपंगता आदींवर उपचार करण्यासाठी पैसे काढू शकतात. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या आरोग्य प्रमाणपत्राची गरज भासत नाही.