मुंबई : ICSE बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यातली मुस्कान पठाण पहिली आलीये. तिला ९९.४ गुण मिळालेत.
बंगळुरूच्या अश्विन राव याच्यासह तिनं संयुक्तरित्या पहिला क्रमांक पटकावलाय. ९९.२ गुणांसह मुंबईचा फरझान आणि बंगळुरूची देवश्री दुसऱ्या स्थानी आहेत.
ICSEच्या बारावीच्या परीक्षेत कोलकात्याची अनन्या मैती ९९.५ गुणांसह पहिली आलीये. तर मुंबईची रिषिका धारीवाल, कोलकात्याचा दिव्येश लखोटिया आणि आयुषी श्रीवास्तव ९९.२५ गुणांसह संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहेत...
विद्यार्थ्यी आपला निकाल cisce.org या अधिकृत वेबसाईटवरुन पाहू शकतात.
असा पाहा आपला निकाल
cisce.org या वेबसाईटवर जा.
१०वीचा निकाल पाहण्यासाठी आयसीएसई निकालवर क्लिक करा
त्यानंतर आपला रजिस्ट्रेशन नंबर टाका आणि निकाल पाहा