मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी

करा अर्ज मिळवा नोकरी

Sunil Desale | Updated: Jun 15, 2018, 02:51 PM IST
मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी title=

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई उच्च न्यायालयात 'शिपाई' १६० जागांसाठी भरती प्रक्रिया होत आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन तुम्हीही मुंबई उच्च न्यायालयात नोकरी मिळवू शकता. एक नजर टाकूयात या संपूर्ण भरती प्रक्रियेवर...

पद : शिपाई / हमाल

एकूण जागा : १६०

शैक्षणिक पात्रता : ७ वी उत्तीर्ण

पात्रता : शिपाई पदाला अनुषांगिक आणि दैनंदिन जीवनाला उपयुक्त अशी कला किंवा विशेष अर्हता असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य मिळू शकेल.

वयोमर्यादा : ९ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे 

(उमेदवार जाहिरात प्रसिद्धीच्या तारखेला १८ वर्षांपेक्षा लहान आणि ३८ वर्षांपेक्षा मोठा नसावा. मागासवर्गीयांसाठी कमाल मर्यादा ४३ वर्षांची असेल. न्यायलयीन आणि शासकीय कर्मचाऱ्यांना कमाल वयोमर्यादेची अट लागू नाही.)

ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरण्याचा कालावधी : 

१८ जून २०१८

अर्ज करण्याची पद्धत :

  • अर्ज सादर करताना दिलेल्या वेबसाईट (महाऑनलाईन) वरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुनच अर्ज सादर करावा.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्विकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकरण्यात येणार नाहीत.
  • पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज bhc.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ९ जून २०१८ ते दिनांक १८ जून २०१८ पर्यंत सादर करणं आवश्यक राहील.

अर्ज करण्यासाठी bhc.mahaonline.gov.in या लिकंवर क्लिक करा.