राशीभविष्य - तुमचा आजचा दिवस कसा जाणार, हे जाणून घ्या?

 तुमचा आजचा दिवस कसा जाणार, हे जाणून घ्या?

Updated: May 2, 2020, 06:42 AM IST
राशीभविष्य - तुमचा आजचा दिवस कसा जाणार, हे जाणून घ्या? title=

मेष - कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्या. आज आपल्याला मनाजोगे जगता येईल. आपली आवड जपण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुम्हाला आनंद प्राप्त होईल.

वृषभ - एखादे छानसे पुस्तक वाचा. मन कसे आनंदी राहील. दिवस एकदम मजेत जाईल. मनावरील ताण कमी होईल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. 

मिथुन  आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. दिवस खेळीमेळीत जाईल.  कौटुंबिक वातावरणात रमाल. आज तुम्हाला आराम मिळेल. त्यामुळे नव्याने काम करण्यासाठी उत्साह मिळेल.

कर्क -  जोडीदाराला प्राधान्य द्यावे. किरकोळ गैरसमज दूर करावेत. त्यामुळे कौटुंबिक वातावरण चांगले राहिले. चिडचिड करुन त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

सिंह - काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.

कन्या - विरोधकांचा विरोध मावळेल आणि अडचणीतून मार्ग काढता येईल. कौटुंबिक वाद होणार नाही, याकडे जास्त लक्ष द्या.

तूळ - आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. सुरु असलेल्या कामात यश येईल. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

वृश्चिक - आज आपल्याला मित्रांचा सहवास या ना कारणाने लाभू शकतो. फोनवर एकमेकांची चौकशी करण्यात वेळ  जाईल. त्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

धनु - थोडीसी आर्थिक चणचण आहे. त्यामुळे आर्थिक नियोजन कसे करायाचे यावर भर दिला पाहिजे. एकादी चिंता सतावत राहिल. तुम्ही जास्त काळजी करु नका. सगळे काही व्यवस्थित होईल.

मकर - आपल्याला अधिकार गाजविण्याची संधी मिळेल.  मात्र, त्याचा अतिरेक होऊ देऊ नका. जोडीदाराचे मत विचारात घ्या.  

कुंभ - कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे आवश्यकता नसेल तर प्रवास करु नका. एखाद्या वादात अडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही लांबच राहा.

मीन - आज काही कामातून समाधान मिळेल. संपती खरेदी करण्याचा योग आहे. जमिनीच्या कामातून फायदा होईल. आपल्या इच्छा पूर्णत्वाला जातील.