... नाहीतर रोहित शर्मा असेल भारतीय संघाचा कर्णधार !

 सिरीजनंतर झालेल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ९ विकेटने पराभव झाला. त्यानंतर अमेरिकेत एक शॉर्ट ब्रेक घेऊन विराट श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Aug 9, 2017, 12:31 PM IST
... नाहीतर रोहित शर्मा असेल भारतीय संघाचा कर्णधार ! title=

नवी दिल्ली: सिरीजनंतर झालेल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ९ विकेटने पराभव झाला. त्यानंतर अमेरिकेत एक शॉर्ट ब्रेक घेऊन विराट श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेला. 
सातत्याने खेळणाऱ्या विराटला टी-२० मध्ये विश्रांती दिली असती तर त्याच्या जागी रोहित शर्माचा खेळ बघून त्याच्याकडे संघाची जबाबदारी सोपवली असती. आयपीएल मध्ये रोहित अतिशय उत्तम खेळला. मुंबई इंडियन्सचे कर्णधार पद सांभाळताना रोहित शर्माने 'कॅप्टन कूल' प्रमाणे उत्तम नेतृत्व केले. त्यांचे नेतृत्व  पाहून फॅन्स देखील टी-२० मध्ये रोहित शर्माला कर्णधार पद देण्याची मागणी करत होते. 
खेळावर परिणाम होऊ शकतो:
विश्रांती न घेता सातत्याने खेळण्यास खेळावर परिणाम होऊ शकतो. मिडियाने दिलेल्या वृत्तानुसार कोहली सातत्याने खेळामुळे दमला आहे आणि त्याला विश्रांतीची आवश्यकता आहे. आतापर्यंत कोहलीच्या खेळाचे प्रदर्शन अतिशय उत्तम होते. श्रीलंकेत खेळलेल्या तीन मॅचच्या कसोटी सिरीजमध्ये भारताने २-० ने आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर भारताने गेल्या २ वर्षात श्रीलंकेत जावून सलग दुसऱ्यांदा कसोटी सिरीज जिंकून इतिहास रचला आहे. विराटच्या टीमने २ वर्षात सलग ८ व्या कसोटी सिरीजमध्ये विजय प्राप्त केला आहे. 
९ वर्षांचा रेकॉर्ड तोडला:

सिरीजमध्ये श्रीलंकेने पहिली कसोटी मॅच जिंकून भारताचा ९ वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक केला. त्याचबरोबर टीमचे मुख्य कोच रवी शास्त्री म्हणाले की, विराटच्या टीमकडे असामान्य काम करण्याची क्षमता आहे. विराट २७-२८ टेस्ट मॅच खेळला असून त्याच्या खेळातील फरक लगेच जाणवतो. तो अतिशय परिपक्व कर्णधार असून अनुभवाने अधिक परिपक्व होईल. त्याच्या वयानुसार त्याने बरेच काही मिळवले आहे.