PAK vs ZIM: “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा..." पराभव होताच भारताच्या माजी खेळाडूंनी उडवली खिल्ली

Pakistan vs Zimbabwe T20 World Cup:  पाकिस्तानच्या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही (Virender Sehwag) दोन ट्विट केले आहेत. 

Updated: Oct 28, 2022, 01:36 PM IST
PAK vs ZIM:  “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा..." पराभव होताच भारताच्या माजी खेळाडूंनी उडवली खिल्ली   title=

T20 World Cup 2022 : T20 विश्वचषक ( t20 world cup 2022) स्पर्धेत झिम्बाब्वेने पाकिस्तानचा 1 धावाने पराभव केला आहे. पर्थ स्टेडियमवर झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानला (Pakistan vs Zimbabwe) 131 धावांचे आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करताना पाकिस्तानाच्या फलंदाजांची दमछाक झाली.

130 धावांमध्येच पाकिस्तानला आपला खेळ गुंडाळावा लागला. T20 विश्वचषक ( t20 world cup 2022) स्पर्धेतील पाकिस्तानचा हा सलग दुसरा पराभव आहे. पाकिस्तानचा अधिक आत्मविश्वास आणि खराब फलंदाजी हे या पराभवाचे सर्वात मोठे कारण होते. एवढेच नाही तर या पराभवानंतर आता पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

पाकिस्तानच्या या पराभवानंतर समाजमाध्यमांत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये पाकिस्तानला ‘मिस्टर बीन’ म्हणत सेहवागने खिल्ली उडवली आहे. झिम्बाब्वेच्या एका चाहत्याने केलेलं ट्विट रिट्विट करत सेहवाग म्हणाला की, “भाऊ खोटारड्या मिस्टर बीन पाकिस्तानचा तुमच्या संघाने काय बदला घेतला आहे.”

दुसऱ्या ट्विटमध्ये सेहवागने झिम्बाब्वेच्या फलंदाजीनंतर पाकिस्तानची स्थिती आणि पाकिस्तानच्या फलंदाजीनंतरची स्थिती, असं दर्शवलं आहे. दरम्यान, सेहवागचे हे दोन्ही ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आहे.

पाकिस्तानच्या परभवानंतर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकी गोलंदाज अमित मिश्रानेही ट्विट करत जखमेवर मीठ चोळलं आहे. “हा पराभव नाराजी करणारा नाही. हा नेहमीच झिम्बाब्वेचा सामना होता. शेजाऱ्यांसाठी आजचा वाईट दिवस आहे,” असं अमित मिश्राने म्हटलं आहे.

 वाचा : आपल्या माणसांविरुद्धच उभा ठाकला भारताचा सुपूत्र; नाईलाजानं सोडावा लागला देश,  जाणून घ्या या खेळाडूबद्दल

पाकिस्तानचा अखेरच्या चेंडूवर पराभव

अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानला विजयासाठी 3 धावांची आवश्यकता होती, शाहिन आफ्रिदीने अखेरच्या चेंडूवर आफ्रिदीने एक धाव काढली आणि दुसरी धाव काढताना शाहिन आफ्रिदी धावबाद झाला. अखेर झिम्बाब्वेने विजयावर शिक्कामोर्तब केला आणि ऐतिहासिक कामगिरी केली. आक्रमक वाटणारा मोहम्मद नवाज अखेरच्या षटकात झेलबाद झाला.