...म्हणून जुही चावलाकडे पाहून फॅन्सना आली नीता अंबानींची आठवण

 सोशल मीडियात फॅन्सकडून प्रतिक्रीया 

Updated: Oct 30, 2020, 11:26 AM IST
...म्हणून जुही चावलाकडे पाहून फॅन्सना आली नीता अंबानींची आठवण  title=

नवी दिल्ली : आयपीएल २०२० मध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सला ६ रन्सनी मात दिली. या पराभवानंतर केकेआरचा खेळ बिघडला आणि प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांना सुरुंग लागला. पण यावेळी केकेआरची मालकीण जुही चावला तिथे उपस्थित होती. कॅमेरा जाताच तिने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. पण तिला पाहून फॅन्सना मुंबई इंडीयन्सच्या मालकीण नीता अंबानी यांची आठवण आली. सोशल मीडियात फॅन्सकडून तशा प्रतिक्रीया येऊ लागल्या. 

मॅच दरम्यान जुही जावला केकेआर जिंकावी यासाठी प्रार्थना करताना दिसली. त्यावेळी तिने आपले डोळे बंद केले होते. हा देखावा प्रेक्षकांना पाहील्यासारखा वाटला. म्हणून प्रेक्षकांनी जुही चावलाची तुलना नीता अंबानी यांच्याशी केली.

आयपीएल २०१९ मध्ये मुंबई इंडीयन्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये १२ मेला फायनल मॅच खेळली जात होती.

यावेळी चेन्नईला जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये ९ रन्सची गरज होती. जे येल्लो आर्मीसाठी खूपच सोपं दिसत होतंय. यावेळी मॅच दरम्यान नीता अंबानी डोळे बंद करुन प्रार्थना करताना दिसत होत्या. २९ ऑक्टोबर २०२० ला जुही चावला देखील प्रार्थना करताना दिसली. 

यामुळे क्रिकेट फॅन्सच्या २०१९ च्या आठवणी ताज्या झाल्या. लोकांनी जुहीची तुलना नीता अंबानींशी केली. नीता अंबानींच्या टीम त्यावेळी जिंकली होती. पण जुही चावलाच्या प्रार्थनेचा केकेआरला फायदा झाला नाही. केकेआरने हा सामना गमावला. पण मॅचनंतर ट्वीटरवर जुही आणि नीता अंबानींच्या फोटोची चर्चा पहायला मिळाली.